पन्हळघर धरणाच्या  sakal
मुंबई

Raigad : पन्हळघर धरणाचे स्वप्न अपुरेच ; ५० वर्षांनंतरही शेतीचा पाणीप्रश्‍न सुटेना

प्रकल्पग्रस्तांची परवड कायम

सकाळ वृत्तसेवा

माणगाव : पन्हळघर धरणाच्या कालव्याला पुरेसा निधी सरकारकडून मिळत नसल्यामुळे डावा व उजव्या अशा दोन्ही कालव्यांची कामे रखडली आहेत. या धरणामुळे शेतीला पाणी मिळेल आणि या भागात हरितक्रांती होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. यासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्च होऊनही हे धरण आजही अपूर्णच आहे.

त्याच पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे व स्वप्नील शिर्के यांनी प्रत्यक्ष धरण व कालव्याची पाहणी केली. त्यानंतर प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांची भेट घेत त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन देणार असल्याचे सांगितले.

लघु पाटबंधारे योजनेंतर्गत १९७३ मध्ये पन्हळघर धरणाचे काम सुरू झाले. यासाठी २२ लाख ८० हजारांची तरतूद करण्यात आली होती. ही रक्कम कमी पडल्याने सरकारने ती वाढवली. या धरणातून डावा व उजवा असे दोन कालवे पाडण्यात आले. पुढे या मार्गावर वन खात्याची जमीन असल्यामुळे त्यांच्या मंजुरीमुळे हे काम रखडले आहे. या धरणामुळे पन्हळघर खुर्द, पन्हळघर बुद्रुक, अंबर्ले या तीन गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला बारमाही पाणी मिळण्याचे नियोजन होते. त्यामुळे येथील शेतकरी बारमाही पिकांसोबत भाजीपाला व कडधान्यांचे पीक घेऊन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, अशी सरकारची भूमिका होती.

यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. या तीन गावांसह नदीवर अवलंबून असणारी आठ गावे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या छोट्या-मोठ्या गावांचा पाणीप्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती. ५० वर्षांपासून काळ नदीच्या पात्रावर उभे असणाऱ्या या धरणावर फक्त पाणी साठवण केले जाते. या धरणातून जे पाणी वाहते ते पाणी नदीच्या पत्रातून बारमाही वाहत असल्यामुळे नदीवर अनेक गावे अवलंबून आहेत. या धरणाचा उपयोग शेती व बागायतदारांना झाल्यास या भागात हरितक्रांती होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, बाधित शेतकऱ्यांच्या पदरी ५० वर्षांनंतरही उपेक्षाच वाट्याला आली आहे.

शेती कोरडी, नोकरी नाही, मोबदलाही नाही

पन्हळघर येथील धरणाच्या कालव्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. काही शेतकऱ्यांना सरकारकडून २००५ मध्ये तुटपुंजा मोबदला मिळाला. तर काही जण आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. काहींना प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळाले आहेत; मात्र नोकऱ्या दिलेल्या नाहीत. शेती कोरडी, नोकरी नाही, मोबदलाही नाही, अशी स्थिती प्रकल्पग्रस्तांची झाली आहे, अशी माहिती पन्हळघर येथील बाधित शेतकरी दीपक करकरे, राजाराम कदम यांनी पंकज तांबे यांना यावेळी दिली.

पन्हळघरवर दृष्टिक्षेप धरणाची लांबी

  • - ६५८ मी (सांडवासह)

  • धरणाची उंची

  • - १९. २५ मीटर

  • डावा कालवा

  • - ३.७२० मीटर

  • उजवा कालवा

  • - २.९०० मीटर

  • शाखा कालवा

  • - ०.१७ मीटर

  • पाणलोटक्षेत्र

  • २.७४ चौ.मी.मी.

  • सरासरी वार्षिक पर्जन्यमापक

  • - ३६९९ मि.मी

  • धरणाची शिखर पातळी

  • - ११६.५० मीटर

  • महापूर पाण्याची पातळी

  • - १९५.०० मीटर

  • एकूण धरण पाणीसाठा

  • - ३.२३ दल.घ.मी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT