औद्योगिक  sakal
मुंबई

Raigad : वेदांत कंपनीला काळीज ग्रामस्थांचा विरोध

औद्योगिक क्षेत्रामधील काळीज गावालगत वेदांत डायस्टफ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करण्यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

महाड : औद्योगिक क्षेत्रामधील काळीज गावालगत वेदांत डायस्टफ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करण्यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे. या ठिकाणी कंपनी सुरू करण्यास काळीज ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. कारखान्यामुळे भविष्‍यात परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या कारणास्तव ग्रामस्थांनी बुधवारी महाड तहसील कार्यालयाला याबाबत निवेदन सादर केले.

महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक रासायनिक औषध निर्माण कारखाने असून आता त्यात वेदांत डायस्टफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची भर पडणार आहे. काळीज गावामध्ये प्लॉट नं. के ११-१२ या ठिकाणी ही कंपनी सुरू करण्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कंपनीला जागा दिली आहे. या ठिकाणी कोणतीही कंपनी सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ज्‍याठिकाणी कंपनी उभारली जाणार आहे,

त्या जागेलगत काळीज गावाची वस्ती आहे. तसेच या जमिनीवर मोकळा प्लॉट म्हणून आरक्षण दाखवण्यात आले होते. बाजूलाच क्रीडांगणही आहे. कंपनीमध्ये डाईज पिगमेंट बनवले जाणार असल्यामुळे तसेच उत्पादनही पावडर स्वरूपात असल्याने ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्या स्वरूपात कंपनी उभारली जाऊ नये,

असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत काळीज ग्रुप कंपनीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर तसेच महिलावर्गाने निषेध व्यक्त करून तहसीलदारांना याबाबत पत्र दिले आहे. नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी ग्रामस्थांनी दिलेले निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

कंपनीसाठी दिलेल्‍या जागेवर आरक्षण असतानाही ते बदलून जागा देण्यात आली. या ठिकाणी कंपनी होणे ग्रामस्थांच्या हिताचे नाही.

- चैतन्य म्हामुणकर, सरपंच, काळीज-खरवली ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार तुफान वाढणार; महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा होणार परिणाम, एक्स्पर्टने सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Maharasthra Vidansaha Election: ईव्हीएम गडबड नाही, निवडणुक आयोगाने फेटाळला आरोप

IND vs AUS 1st Test: अरे, आधी अम्पायरकडे बघ! Mohammed Siraj सेलिब्रेशन करत पळत सुटला, मग पुढे जे घडलं ते...; ड्रेसिंग रुममध्ये रोहितही दिसला

SCROLL FOR NEXT