File Photo 
मुंबई

रेल्वेची खानपान सेवा महागणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लांब पल्ल्याच्या मेल, एक्‍स्प्रेसमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती आगामी वर्षात वाढणार आहे. साधारण ५ ते १५ रुपयांपर्यंतची वाढ असून त्यावर पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) द्यावा लागणार आहे. हे दर २८ मार्च २०२० पासून लागू होणार आहेत.

रेल्वे बोर्डाच्या अन्न व पेय विभागाच्या संचालकांकडून नव्या दरांचे परिपत्रक सर्व विभागीय रेल्वे मंडळांना पाठविण्यात आले आहेत. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांसह राजधानी, दुरांतो, शताब्दी या विशेष गाड्यांमधील खानपानही महागणार आहे. या विशेष गाड्यांचे तिकीट बुक करतानाच जेवणाचे पैसे मोजावे लागणार आहेत.
प्रवासाच्या श्रेणीनुसार ही दरवाढ करण्यात आली आहे. पाच वर्षांत महागाई वाढलेली असताना खाद्य पदार्थाचे दर वाढले नव्हते. त्यामुळे २०१४ नंतर पहिल्यांदा दरांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

एसीसाठी दर 
एसी कारमध्येपूर्वी १५ रुपयांना मिळणारा चहा २० रुपयांना 
नाश्‍त्यासाठी ९७ ऐवजी १०५ रुपये द्यावे लागतील. 
जेवणासाठी १७५ ऐवजी १८५ रुपये मोजावे लागणार आहेत.

किमान खानपान सेवा

खाद्यपदार्थांची किंमत -  प्रस्तावित दर (जीएसटीसह)
नास्ता (शाकाहारी)          ३५
 नास्ता (मांसाहारी)          ४५
 अंडा करी                       ८०
 चिकन करी                    १२०
 शाकाहारी बिर्याणी           ३५०  ग्रॅम - ७०
 अंडा बिर्याणी                  ३५०  ग्रॅम - ८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT