Decision to install 3065 camera with facial recognition system at 117 central railway stations nashik news SAKAL
मुंबई

Railway: १० रेल्वे कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

Railway: रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या मध्य रेल्वेच्या १० रेल्वे कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापकांकडून गौरव करण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ३, नागपूर विभागातील १, पुणे विभागातील ३ आणि सोलापूर विभागातील ३ कर्मचाऱ्यांना 'महाव्यवस्थापक संरक्षण पुरस्कार देण्यात आलेला आहेत.

सीएसएमटी येथे मंगळावरी (ता. १६) आयोजित कार्यक्रमात प्रसंगावधान दाखवून योग्य कामगीरी करणाऱ्याला "महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार" प्रदान केला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि दोन हजार रुपये रोख पुरस्कार यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक राम करण यादव यांनी सन्मानित कर्मचार्‍यांच्या सतर्कतेचे कौतुक केले आणि ते सर्व कर्मचार्‍यांसाठी आदर्श असल्याचे सांगितले. मुंबई विभागातील ट्रेन व्यवस्थापक संजीत प्रसाद सिंग यांनी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी डाउन मालगाडी मध्ये काम करत असताना, अप लाईनवरील जसई यार्ड आणि होल्डिंग यार्ड दरम्यान किमी ८८/११-१३ वर रूळाला तडा गेलेला दिसला.

त्यांनी सदर माहिती संबंधितांना दिली व तडा ठीक करण्यात आला आणि ट्रेनचे परिचालन पुन्हा सुरू झाले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. तसेच मुंबई विभागातील पेण स्थानक उपव्यवस्थापक नीरज कुमार यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी पेण स्थानकावर कामगिरीवर असताना, जाणाऱ्या मालगाडीसोबत सिग्नल्सची देवाणघेवाण करताना, इंजिनच्या मागील चाकातून स्पार्क बाहेर पडताना दिसला. मालगाडी तात्काळ थांबवण्यात आली आणि तपासणी केली असता आढळून आले की ब्रेक बाइंडिंग आणि फ्लॅट टायरमुळे ट्रॅकमध्ये १२ ठिकाणी खड्डे निर्माण झाले होते. तात्काळ समस्या दूर करण्यात आली आणि मालगाडी १० किमी प्रतितास वेग प्रतिबंधासह पुन्हा सुरू करण्यात आली.

त्यांची सतर्कता आणि तत्परता यामुळे गंभीर दुर्घटना टाळण्यास मदत झाली. ट्रेन व्यवस्थापक संजीत प्रसाद सिंग आणि पेण स्थानक उपव्यवस्थापक नीरज कुमार यांच्या गौरव करण्यात आला आहे. याशिवाय नागपूर विभागातील तंत्रज्ञ सुधीर भाऊदास चव्हाण, पुणे विभागातील रूळ व्यवस्थापक चिरंजीलाल बैरवा, तंत्रज्ञ राजीव कुमार, निखिल कांबळे,सोलापूर विभागातील स्थानक उपव्यवस्थापक पी.जे. जिजीमोन, पॉइंट्समन सुनील कुमार आणि गेटमनविनोद कुमार यांच्या गौरव करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT