Matheran Railway  sakal
मुंबई

Railway: माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; वाचा संपूर्ण बातमी

Railway: मुंबई सेंट्रल स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलिशान पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड उभारण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरान हे राज्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे. दररोज ह्या हिल टेशनला हजारोंच्या संख्येत पर्यटक भेट देत असता. मात्र, हिल टेशनवर मध्य रेल्वेने परवडणारे आणि किफायतशीर पॉड हॉटेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पॉड हॉटेलसाठी एका खासगी कंपनीशी मध्य रेल्वेने नुकताच करार केला आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल रेल्वेला मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

भारतीय रेल्वेने प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मुबल दरात उपलब्ध करून देण्यासाठी नॉन फेअर रेव्हेन्यू योजनेंतर्गत स्थानकावर आणि रेल्वे परिसरात बाहेर अनेक सुविधा सुरु केल्या आहे. या करारांतर्गत मुंबई सेंट्रल स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलिशान पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड उभारण्यात आले आहे.

त्याला प्रवाशांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. पॉड हॉटेलला प्रतिसाद बघता आता मध्य रेल्वेने पर्यटकांचा सुविधेसाठी माथेरानमध्ये पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यांसंदर्भात निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली आहे. लवकर प्रवाशांचा सेवेत अत्याधुनिक पॉड हॉटेल दाखल होणार आहे.

दहा वर्षांसाठी करार -

पॉड हॉटेलच्या विकास आणि संचालनाचे कंत्राट ई-लिलावाद्वारे देण्यात आले आहे. यशस्वी बोलीकर्त्याने ८ लाख १९ हजारच्या वार्षिक रकमेसाठी करार सुरक्षित केला. कराराची पहिली तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवाना शुल्कात १० टक्के वार्षिक वाढ करण्याच्या तरतुदीसह एकूण कराराचा कालावधी १० वर्षांचा असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहे.

सर्वात मोठे पॉड हॉटेल -

माथेरानमधील ७५८.७७ चौरस मीटर जागेवर हे पॉड्स हॉटेल उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल स्थानकावरील उभारण्यात आलेल्या पॉड हॉटेलपेक्षा माथेरान तिप्पटी हे मोठे हॉटेल असणार आहे. यामध्ये सुमारे शंभर पेक्षा जास्त पॉड्स उभारण्यात येणार असून सिंगल पॉड्स, दुहेरी पॉड्स आणि फॅमिली पॉड्स सारखे सर्व श्रेणीसाठी हे पॉड हॉटेल असणार आहे.

पॉड हॉटेलचे वैशिष्ट्य -

- श्रेणी निहायत पॉड्स असणार

- वातानुकूलित असणार

- मोबाईल चार्जिंग सुविधा,

- लॉकर रूम सेवा,

- फायर अलार्म,

- इंटरकॉम सिस्टम,

- डिलक्स टॉयलेट

- अत्याधुनिक शौचालय

पर्यटकांना मिळणार दिलासा -

दररोज ह्या हिल टेशनला हजारोंच्या संख्येत पर्यटक भेट देत असता. मात्र, इथे महागड्या हॉटेल आणि लॉजमुळे अनेकजण सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्यापासून मुकतात. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने माथेरानला स्वस्त पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. आता ही पॉड हॉटेलची सेवा प्रत्येक्षात सुरु होत असल्याने पर्यटकांना स्वस्त दरात मुक्कामाची सोय होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT