railway station sakal
मुंबई

कोरोना उपाययोजनांबाबत रेल्वे प्रशासन सुस्त!

शरीराचे तापमान मोजण्याचे 'फेब्रीआय कॅमेरे' बंद;ऑपरेटिंग सिस्टमलाही टाळे

कुलदीप घायवट

मुंबई : कोरोनाकाळात (Corona) प्रवाशांच्या शरीराचे तापमान (Body temperature) मोजण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकात 'फेब्रीआय ब्लॅंक बॉडी' कॅमेरे यंत्रणा बसविली होती. यामुळे रेल्वे स्थानकातून(Railway Station) ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे तापमान मोजण्यात प्रशासनाला गर्दीचा अडथळा होत नव्हता.गर्दीविना तापमान मोजण्यास मदत होत होती. स्थानकात प्रवेश केलेल्या व्यक्तीचे शरीराचे तापमान चेक करुन त्याला ताप आलाय का,याची खात्री केली जात होती.मात्र,ही सद्यस्थितीत ही यंत्रणा बंद झाली असून ऑपरेटिंग सिस्टीमलाही (operating system) टाळे लावण्यात आले आहेत.त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजनेचा रेल्वेला विसर पडला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Railway Government ignores Corona treatment guidelines as operating system locked body temperature scanning machine too)

कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांची प्रभावीपणे स्कॅनिंग करण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे स्क्रीनिंग सुविधा (फेब्रीआय) कॅमेरे जून 2020 मध्ये बसविले होते.या सुविधेद्वारे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये, म्हणून रेल्वे प्रवाशांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून सेवा देत होती.

मात्र,एका वर्षातच ही यंत्रणा बंद करण्यात आल्याने रेल्वे स्थानकात थर्मल स्क्रिनिंग, प्रवाशांचे तापमान मोजले जात नाही. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. सुरूवातीला प्रवाशांनी या कॅमेऱ्यांच्या समोरून जावे, यासाठी बॅरिकेटर्स लावले होते. मात्र, आता येथील बॅरिकेटर्स देखील काढण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या फेब्रीआय कॅमेऱ्याद्वारे शरीराचे तापमान मोजले जाते.ब्लॅंक बॅाडीसह 0.3 डिग्री सेल्सियसपर्यंत कमी-अधिक अचूकता याद्वारे दाखविली जाते.फेब्रीआय उष्णतेचे सेन्सर वापरते.जे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील उष्णतेची नोंद करू शकते.ज्यावेळी प्रवासी कॅमेऱ्यांसमोरून जातील, तेव्हा प्रवास करणाऱ्या व्यक्तीचे तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक असल्यास कॅमेर्‍याशी संलग्न असलेल्या संगणकाच्या स्क्रीनवर दर्शविण्यात येते.

''कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी अजून कोरोना संपला नाही. रेल्वे प्रशासनाने करोडो रुपये खर्चून कोरोनाबाबत खबरदारीची उपाययोजना राबविली आहे. फेब्रीआय कॅमेऱ्यांची सुविधा उत्तम असून रेल्वेने निष्काळजीपणा न करता ही सुविधा सुरूच ठेवली पाहिजे. 24 तास हे कॅमेरे आणि ऑपरेटरद्वारे प्रत्येक प्रवाशांवर नजर ठेवणे आवश्यक आहे.''

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

''कोणी प्रवासी नसताना, ऑपरेटर वाॅशरुमला गेल्यावर 10 मिनिटांसाठी मॉनिटर बंद होता'', असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. तर "सीएसएमटी स्थानकावर कोरोना काळातही प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे एका क्षणाचा कालावधीही संकटाचा होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेने ऑपरेटर सिस्टम बंद ठेवणे चुकीचे आहे''असे प्रवासी संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT