मुंबई : मध्य रेल्वेच्या एका गिर्यारोहक संघाने हिमालयातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट नुनवर यशस्वीरित्या चढाई केली. या पर्वतारोहण मोहिमेला २९ जुलै २०२२ रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त हिरवा झेंडा दाखवून माऊंट नुनवर चढाई करण्यासाठी रवाना केले होते.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी संघटन अभिनंदन करताना म्हणाले, “सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या ४ गिर्यारोहकांच्या चमूने पूर्व हिमालय पर्वतरांगांतील नुन-कुन पर्वताचे सर्वोच्च शिखर माउंट नुन (७ हजार १३५ मीटर) यशस्वीरित्या सर केले. यांतून संघातील गिर्यारोहकांचे खरे धैर्य, दृढनिश्चय आणि हिम्मत दर्शविते.
सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या चार सदस्यीय गिर्यारोहण संघाचे नेतृत्व मुंबई विभागातील अभियांत्रिकी शाखेत कार्यरत मुख्य कार्यालय अधीक्षक हेमंत जाधव आणि सेंट्रलाइज्ड इलेक्ट्रिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ठाकुर्ली येथील कार्यालय अधीक्षक संदीप मोकाशी तसेच संतोष दगडे व धनाजी जाधव यांच्या सोबत २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता ७,१३५ मीटर उंचीचे नुन शिखर यशस्वीरित्या पार केले. हेमंत जाधव आणि संदीप मोकाशी हे २३,४०९ फूट उंचीचे शिखर सर करणारे पहिले भारतीय रेल्वे कर्मचारी असावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.