Railway News: मध्य रेल्वेने उपनगरीय लोकल आणि मेल -एक्सप्रेसमध्ये अधिकृत फेरीवाल्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मध्य रेल्वेने १५० मेल-एक्सप्रेसमध्ये ३०० अधिकृत फेरिवाले नियुक्तीसाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती केली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उपनगरीय लोकल सेवा आणि मेल - एक्सप्रेस गाड्यात बेकायदेशीर फेरीवाल्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेने या बेकायदेशीर फेरीवाल्याना आळा घालण्यासाठी त्यांच्या जागी अधिकृत फेरीवाल्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर काही प्रवासी संघटनाने लोकलमध्ये फेरीवाल्याचा नियुक्ती संदर्भात विरोधात केला होता. त्यामुळे मध्य रेल्वेमी फक्त १५० मेल-एक्सप्रेसमध्ये ३०० अधिकृत फेरिवाले नियुक्तीसाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीएसएमटी आणि एलटीटी येथून अप आणि डाउन मार्गावरील १५० मेल-एक्सप्रेसमध्ये येत्या दोन महिन्यात ३०० फेरिवाल्यांची नियुक्ती संबंधित कंत्राटदार करणार आहे. या फेरिवाल्याला खाद्यपदार्थासह,घरगुती साहित्य,प्रसाधनगृहे ,पुस्तके विकण्ंयाची परवानगी असणार आहे. याद्वारे मध्य रेल्वेला वर्षाला ३२ लाखांच्या महसूल मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.