Indian Railway New Decision esakal
मुंबई

Railway News: रेल्वे झाली मालामाल; आठ महिन्यात झाला इतक्या हजार कोटींचा महसूल जमा!

गेल्या वर्षी याच कालावधीत ४०७७.६२ कोटी रुपये महसूल मिळवला होता. नोव्हेंबर महिन्यात मध्य रेल्वेने एकुण १३१.५६ दशलक्ष प्रवाशांची वाहतुक केली,त्यातून ५९५ कोटी ५६लाखांचा महसुल घेतला.

Chinmay Jagtap

Railway News: मध्य रेल्वेवर गेल्या आठ महिन्यात १२ हजार ४९७ कोटीचा महसूल जमा केला आहे. ज्यामध्ये प्रवासी वाहतुकीतून चार हजार ६९९ कोटी तर मालवाहतुकीतून ६ हजार १४६ कोटीपेक्षा जास्त महसूलाच्या समावेश आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरुन दररोज सुमारे ३५ ते ३६ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात मध्य रेल्वेने एकुण एक हजार ३९ दशलक्ष प्रवाशांची वाहतुक केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९४०.७८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली होती.

म्हणजेच प्रवासी संख्येत १०.४६ टक्के वाढ झाली आहे.या प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत ४६९१.१० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत ४०७७.६२ कोटी रुपये महसूल मिळवला होता. नोव्हेंबर महिन्यात मध्य रेल्वेने एकुण १३१.५६ दशलक्ष प्रवाशांची वाहतुक केली,त्यातून ५९५ कोटी ५६लाखांचा महसुल घेतला.

मालवाहतुकीवर भर

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वस्तू व सामानाच्या वाजतुकीतून ६१४६.८३ कोटी इतका होता. एप्रिल ते नोव्हेंबर - २०२२ या कालावधीत ५३८०.१५ कोटी होता, तुलनेने ह्यात १४.२२ टक्यांची वाढ झाली. विशेष नोव्हेंबर महिन्यात ७८५.५१कोटी रुपयांची मालवाहतुक केली आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत, इतर कोचिंग, सामान, नॉन-फेअर महसूल तसेच विविध माध्यमांतून प्राप्त झालेला महसूल (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालय वापर इत्यादीसह) रु.१६५१.४८ कोटी इतके आहे. गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर - २०२२ कालावधीत प्राप्त झालेल्या १३९१.१२ कोटी महसुलाच्या तुलनेत, तब्बल १८.७१ टक्क्यांची वाढ झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT