मुंबई

Railway News: वंदे भारत, तेजस एक्सप्रेस पावसाळ्यात रद्द? बुकिंग पोर्टलवर गाडी रद्दचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: यंदा कोकण रेल्वे मार्गावरील मान्सून वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत न केल्यामुळे बुकिंग पोर्टलवर वंदे भारत, तेजस एक्सप्रेस सारख्या गाड्या १० जून २०२४ पासून रद्द असा संदेश दाखवत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोधळ उडालेला आहे.

प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर प्रतिवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. याअंतर्गत सर्व गाड्या नियंत्रित वेगाने चालवल्या जातात. यामुळे प्रवास वेळेत वाढ होते. याचा सर्वात जास्त परिणाम अति जलद गाड्यांवर होऊन एका दिवसात मुंबईहून गोव्यात जाऊन परत येणाऱ्या गाड्यांचे आठवड्यातील दिवस कमी होतात. (vande bharat news)

हा परिणाम सध्या पावसाळी वेळापत्रक सुरू होण्या आधीच रेल्वे प्रवाशांना बसत असून मान्सून वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत न केल्यामुळे बुकिंग पोर्टलवर १० जूनपासून वंदे भारत, तेजस एक्सप्रेस सारख्या वेगवान आणि सर्वाधिक पसंतीच्या गाड्या दिसत नाहीत. यामुळे या गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या की काय असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.(tejas express)

भारतीय रेल्वेवर नियमित गाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरु होते. त्यामुळेच पावसाळी वेळापत्रकात होणारे बदलही आरक्षण प्रणालीत तेव्हाच नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु तसे अद्यापतरी झालेले नाही. त्यामुळे २२ ऑगस्ट, २०२४ साठीचे आरक्षण सुरु झाले असले तरी अजूनही मुंबई मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेस,मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस यांसारख्या प्रीमियम गाड्यांचे आरक्षण ९ जून, २०२४ नंतरचे (१० जूनपासूनचे) आरक्षण सुरु झालेले नाही.(railway news)

दरम्यान, याबाबत आयआरसीटीसीवर (म्हणजेच प्रवासी आरक्षण प्रणाली - PRS वर) प्रवाशांना दाखवण्यात येत असणारा संदेशही चुकीचा असून त्यावर "ट्रेन रद्द" असे नमूद केलेले आहे. त्यामुळे या गाड्या जूनपासून रद्द करण्यात आल्या आहेत का? अशी शंका प्रवाशांना येत आहे. त्यातच पुढील दहा दिवसांत कोकणात सर्वांत महत्वाच्या असणाऱ्या सणाच्या दिवसांतले म्हणजेच गणेशोत्सव काळातले आरक्षण सुरु होणार आहे.(prs website)

त्या पार्श्वभूमीवर मध्य आणि कोंकण रेल्वेने लवकरात लवकर पावसाळी वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत करून सर्व गाड्यांचे आरक्षण सुरु करण्याची गरज असल्याचे मत रेल्वे प्रवासी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT