मुंबई: मुंबईत लोकलला (Mumbai local) जीवनवाहिनी म्हटलं जातं. आतापर्यंत याच लोकलमधून प्रवास करताना वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. लोकल प्रवासात दररोज वेगवेगळ्या दुर्घटना घडत असतात. कधी दरवाजाजवळ उभं असताना लोखंडी खांबाला आपटल्यामुळे, (train accident) कधी ट्रेन पकडताना किंवा उतरताना तोल गेल्यामुळे अनेकांनी नाहक आपले प्राण गमावले आहेत. (Railway Police save life of Sadiq Sheikh & dockyard railway station)
अलीकडेच कळवा रेल्वे स्थानकात मोबाइल चोराला पकडताना एका महिलेचा लोकल ट्रेनखाली (Local train) येऊन दुर्देवी मृत्यू झाला. अशाच प्रकारची घटना गुरुवारी संध्याकाळी डॉकयार्ड रेल्वे स्टेशन परिसरात घडली. सुदैवाने सर्तक असलेल्या रेल्वे पोलिसांमुळे एका वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचले. सादिक शेख असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
डॉकयार्ड स्थानकात संध्याकाळच्या सुमारास सादिक शेख ट्रेनमध्ये चढले. त्यांनी लोकलमधील पोलला पकडले होते. ट्रेन सुरु झाली आणि तितक्यात सादिक यांचा पोलवरील हात निसटला व ते खाली पडले. धावती रेल्वे आणि फलाटाच्या मोकळ्या जागेत पडण्याआधीच तिथून जाणारे रेल्वे पोलीस धावत गेले व त्यांनी सादिक यांना बाहेरच्या बाजूला खेचले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. सादिक शेख यांचे प्राण वाचवणाऱ्या पोलिसांचे सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.