Mumbai Rain Alert 
मुंबई

Mumbai Rain Alert : पावसाने आज केली दुर्दशा... मुंबईत किती दिवस राहाणार ही परिस्थिती? जाणून घ्या अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक शहरांमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राजधानी मुंबईमध्ये देखील रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

रोहित कणसे

राज्यातील अनेक शहरांमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राजधानी मुंबईमध्ये देखील रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील पुणे, पालघर, ठाणे, गडचिरोली या ठिकाणी देखील तुफान पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती पाहायला मिळत आहे.

सध्या देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये मान्सूनचा धुमाकूळ सुरू आहे. यादरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि गोवा या राज्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईमध्ये आज काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मुंबईमध्ये वादळी वाऱ्यांसहीत पाऊस कोसळेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला. यानंतर मुंबईत तुफान पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळं मुंबईकरांचे हाल झाले.

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असतानाचा अनेकांना हा पाऊस नेमका कधी थांबणार असा प्रश्न अनेकांना पडतोय. यादरम्यान 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेनं पुढील दोन आठवडे मुंबईत किती आणि कसा पाऊस पडणार याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईत पाऊस कसा असेल याबद्दल जाणून घेऊया.

दोन आठवडे किती पाऊस पडेल?

(स्कायमेटच्या माहितीनुसार)

25 जुलै - मुंबई शहरात ठराविक ठिकाणी प्रचंड पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

26 जुलै - मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊसाची शक्यता आहे.

27 जुलै - शनिवारीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

28 जुलै - मुंबईकरांना रविवारी थोडासा दिलासा मिळणार असून पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

29 जुलै - सोमवारी रविवारच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

30 जुलै - मुंबईत 30 जुलैपासून पुढील 9 दिवस जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

31 जुलै - विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

1 ऑगस्ट - एक तारखेला मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता आहे.

2 ऑगस्ट - काही ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

3 ऑगस्ट - या दिवशीही 1 ऑगस्टप्रमाणेच तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

4 ऑगस्ट - मुंबईत विजांच्या कडकडाटासहीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

5 ऑगस्ट - विजांच्या कडकडाटासहीत पावसाची शक्यता असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

6 ऑगस्ट - या दिवशीही मुंबईत विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडेल असा अंदाज आहे.

7 ऑगस्ट - या दिवशी मुंबईत सुर्याचं दर्शन होऊ शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

8 ऑगस्ट - तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT