rain in Navi mumbai 
मुंबई

नवी मुंबईतील ‘ती’ ढगफुटीच!

अर्चना राणे-बागवान

नवी मुंबई - नवी मुंबई परिसरात बुधवारी (ता.४) झालेला पाऊस ढगफुटीच असल्याचा दावा पुणे येथील हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी केला आहे. सकाळी ९ ते १० या वेळेत १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. हा पाऊस ढगफुटी असल्याचे सांगत, तसा अधिकृत उल्लेख हवामान खात्याच्या अनेक अहवालात असल्याचे त्यांनी म्हटले. 

नवी मुंबईत बुधवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेचार या आठ तासांत २२५. ९२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातील १०० मिमी पाऊस सकाळी ९ ते १० दरम्यान कोसळला. नवी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडील नोंदीनुसार दीड तासात ११०.९५ मिमी पाऊस झाला. 

जोहरे म्हणाले की, १०० मिमी प्रतितास या दराने कोसळणाऱ्या पावसाला ढगफुटी म्हणजे ‘क्‍लाऊडबर्स्ट’ म्हणतात. ढगफुटी ही स्थानिक हवामानामुळे घडणारी घटना असली तरी मुंबई आणि कोकणात अरबी समुद्राकडून भूभागावर लाटेसारखा येणारा बाष्पसाठाही ढगफुटीस कारणीभूत ठरतो. हवामान विभाग महाराष्ट्रातील ढगफुटींना अनेकदा अतिवृष्टी, महावृष्टी अशी नावे देत या ढगफुटी नसल्याचे सांगून दिशाभूल करीत असल्याचा आरोप जोहरे यांनी केला. 

६५ ते १२५  मिमीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस, तर २५० मिमीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे अत्यंत जास्त पाऊस, अशी संकल्पना हवामान खाते वापरते. त्याऐवजी दर तासाला किती मिमी पाऊस झाला, हे हवामान खात्याने सांगणे गरजेचे आहे, असे जोहरे म्हणाले.

अतिवृष्टी म्हणजे ढगफुटी नसते, ती डोंगराळ भागात होते. अतिवृष्टीला ढगफुटी म्हणून गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यात अर्थ नाही. मुंबई, नवी मुंबईला इतक्‍या मोठ्या पावसाची सवय आहे. 
- रंजन केळकर, माजी महासंचालक, हवामानशास्त्र विभाग.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT