Mumbai Rain Sakal
मुंबई

Mumbai Rain Update : पावसामुळे मध्य रेल्वेला वाहतुकीला ब्रेक! शंभर पेक्षा जास्त लोकल गाड्या रद्द

रात्रीपासून सुरु असेल्या पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना चांगलेच झोडपून काढले. बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पाऊसामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रात्रीपासून सुरु असेल्या पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना चांगलेच झोडपून काढले. बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पाऊसामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक रेल्वे स्टेशनमध्ये पाणी भरल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण - कर्जत - कसारा लोकल सेवा बंद केली.

त्यामुळे दिवसभर शंभरपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आली. तसेच लांब पल्ल्याच्या मेल- एक्सप्रेस रेल्वे गाड्या पावसामुळे रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.

बुधवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे लोकल सेवांचा वेग मंदावला होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर सर्व प्रथम हार्बर मार्गाला फटका बसला. सकाळी पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी ९. ४० वाजता सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली.

तब्बल अर्धातास हार्बर मार्गावरील लोकल सेवा खोळंबल्या होत्या. तर, सकाळी ११ नंतर मध्य रेल्वे वर कल्याण, अंबरनाथ, बदलापूर विभागात जोरदार पावसाने बॅटिंग केल्यामुळे अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले होते.

परिणामी सुरक्षेचा दृष्टिकोनातून मध्य रेल्वेने सकाळी ११. १० वाजता अंबरनाथ ते बदलापूर लोकल वाहतूक बंद केली होती. त्यामुळे प्रवाशांना रस्ते मार्गाने प्रवाशांना प्रवास करावा लागला आहे. कोसळत असेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान दुपारी २.४० वाजता ससिग्नल बिघाड झाले. त्यामुळे कल्याण ते कसारा लोकल सेवा ठप्प झाली.

याशिवाय कल्याण दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कल्याण ते डोबिवली लोकल सेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेकडून दुपारी ३ नंतर डोबिवलीपर्यत लोकल सेवा चालविण्यात आल्या. पावसाचा जोर वाढत असल्याने अनेक लवकर कार्यलायातून घरी जाण्यासाठी निघाले.

मात्र, तांत्रिक बिघाड आणि पावसामुळे मध्य रेल्वेचे लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडून पडल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. सीएसएमटी, भायखळा, परळ, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे. दिवा आणि डोबिवली स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली आहेत.

शंभरपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द!

मुसळधार पावसामुळे दिवसभर शंभरपेक्षा जास्त अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. तर लांब पल्ल्याच्या काही मेल- एक्सप्रेस गाड्याही रद्द तर काही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आलेल्या आहे.

ट्रेन क्रमांक १२१२८ पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११००८ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२१०६ पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१२३ सीएसएमटी-पुणे एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक ११००९ सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहे. तर अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावत आहे.

तिन्ही मार्गावर लोकल सेवा विलंबाने

दिवसभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या जलद लोकल २० ते ३० मिनिटे, तर धीम्या मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटाने सकाळी विलंबाने धावत होत्या. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सुद्धा प्रचंड हाल झाले आहे.

पावसाचा विमान सेवेला फटका

पावसामुळे आणि धुकट हवामानामुळे दृष्यमानता कमी झाल्याने विमान सेवावर सुद्धा काही प्रमाणात परिणाम दिसून आला आहे. अनेक विमान सेवा मुंबईतून १५ ते २० मिनिटांनी विलंबाने उड्डाण करत आहे . तर मुंबईत येणाऱ्या विमानांच्या आकाशात घिरट्या घालत असल्याचे चित्र आज दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT