मुंबई

Mumbai Air Quality : ...म्हणून मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; महत्त्वाच्या भागातील AQI जाणून घ्या

संतोष कानडे

मुंबईः मागच्या महिन्याभरापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. परंतु कालपासून हवेचा AQI सुधारल्याचं दिसून येतंय. त्याचं कारण आहे पाऊस. मागच्या तीन दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी मुंबईतदेखील पाऊस कोसळला.

रविवारी नाशिक, मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. नाशिकच्या निफाडमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. नगरमध्येही पाऊस कोसळला. केवळ पाऊसच नाही तर गारपीटदेखील झाल्याचं बघायला मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता मात्र सुधारली आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI 100 च्या खाली गेलाय तर बीकेसीचा AQI 103 इतका आहे. पुढील तीन ते चार दिवस हवेची गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. सोमवारीही मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

कोणत्या भागात हवा सुधारली

  • कुलाबा - 76

  • भांडुप - 37

  • मालाड - 35

  • माझगाव - 47

  • वरळी - 33

  • बोरिवली - 65

  • बीकेसी - 103

  • चेंबूर - 89

  • अंधेरी - 67

  • एकूण मुंबई - 60 AQI

  • नवी मुंबई - 53

हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?

  • शून्य ते ५० एक्यूआय - उत्तम

  • ५० ते १०० एक्यूआय - समाधानकारक

  • १०१ ते २०० एक्यूआय - मध्यम

  • २०१ ते ३०० एक्यूआय - खराब

  • ३०१ ते ४०० एक्यूआय - अतिशय खराब

  • ४०१ ते ५०० एक्यूआय - गंभीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"45 दिवस झोप नाही, जेवणही नाही...", लोन विभागातील कर्मचाऱ्यानं कामाच्या दबावामुळे संपवलं जीवन, आई-वडिलांना शेवटचं पत्र

Bigg Boss Marathi: "अरबाजच्या भिकेमुळे..."; निक्कीचं कौतुक अन् टीकाही, दुसरा फायलनलीस्ट कोण ठरणार... सर्वाधिक मतं कुणाला?

Mahavikas Agadi: महाविकास आघाडीत बिघाडी? मुंबईतल्या 6 जागांवर एकमत होईना..!

Mumbai Road Accident : गोरेगावातील ओबेरॉय मॉलसमोर भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं! 13 वर्षीय मुलीचा जागेवर मृत्यू

International Coffee Day 2024: कॉफीच्या माध्यमातून या स्त्रीने घेतली उद्योगभरारी, नवऱ्याच्या आकस्मिक मृत्यूनंतरही सोडली नाही जिद्द..

SCROLL FOR NEXT