Uddhav Thackeray_Raj Thackeray 
मुंबई

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे आले एकत्र; CM एकनाथ शिंदेंचं वाढणार टेन्शन?

ही भेट दोन्ही ठाकरेंमधील दुरावा कमी करुन राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण देतात का? हे येणारा काळचं ठरवेल.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शुक्रवारी एकत्र आल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. राज आणि उद्धव एकत्र आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं (cm eknath shinde) टेन्शन वाढणार का? हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. (Raj and Uddhav Thackeray came together it will be increased tension of CM Eknath Shinde)

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं वृत्त खरं असलं तरी ते कुठल्याही राजकीय हेतूसाठी नव्हे तर एका कौटुंबिक सोहळ्यासाठी एकत्र आले होते. यावेळी क्लीक करण्यात आलेल्या एका फोटोच्या फ्रेममध्ये हे दोघेही एकत्र दिसून आले आहेत. याच फोटोमध्ये उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील दिसत आहेत. (Latest Marathi News)

एका घरगुती सोहळ्यासाठी दोघेही ठाकरे बंधू एकत्र आले होते. राज ठाकरेंची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. मुंबईतील दादरमध्ये हा सोहळा पार पडला.

दरम्यान, राज्यातीलं आणि देशातीलं राजकीय वातावरण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडानंतर जुन्या शिवसैनिकांचा एक गट असाही आहे ज्यांना ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं आहे. त्यामुळं एका घरगुती कार्यक्रमानिमित्त का होईना या शिवसैनिकांची इच्छा पूर्ण झालेली दिसतेय. पण ही भेट दोन्ही ठाकरेंमधील दुरावा कमी करुन राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण देतात का? हे येणारा काळचं ठरवेल. जर असं काही झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन मात्र वाढू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेला थोडाचवेळात सुरुवात होणार

SCROLL FOR NEXT