मुंबई: पॉर्न फिल्मसची निर्मिती आणि वितरण या उद्योगातून राज कुंद्राने (Raj Kundra) मागच्यावर्षी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान १.१७ कोटी रुपयांची कमाई केली, असे मुंबई पोलिसांनी (Mumbai police) राज कुंद्राची (Raj kundra) कोठडी वाढवून मागताना, मंगळवारी कोर्टाला सांगितले. कोर्टाने ४५ वर्षीय राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती असलेल्या राज कुंद्राला तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai high Court) काल नकार दिला. (Raj Kundra earned Rs 1.17 crore from porn app in five months cops tell court dmp82)
"हॉटशॉट अॅपच्या माध्यमातून ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत 1, 17, 64,886 इतकी कमाई केल्याची माहिती या प्रकरणातील दुसरा आरोपी रायन थॉर्पीने चौकशीत दिली" रिमांड याचिकेत पोलिसांनी ही माहिती नमूद केली आहे. कुंद्राने अॅपल स्टोरच्या अॅपमधून कमाई केली तसेच पोलिसांनी गुगलकडूनही माहिती मागितली आहे.
हे अॅप काढून टाकण्याआधी अॅपल स्टोर पेक्षा गुगल प्ले स्टोअरवर जास्त युझर्स होते. त्यामुळे जास्त पैसा कमावलाय असा पोलिसांचा दावा आहे. २४ जुलैला राज कुंद्राच्या कार्यालयातून नऊ फाईल्स जप्त करण्यात आल्या. त्यातील कागदपत्रांची तपासकर्त्यांना छाननी करायची आहे, असे रिमांड अर्जात म्हटले होते.
उद्योगपती राज कुंद्राला (Raj kundra) तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai high Court) आज नकार दिला. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कुंद्राला पोलिसांनी ता. 19 रोजी अटक केली आहे. अश्लील चित्रफिती तयार केल्याचा आरोप पोलिसांनी त्याच्यावर ठेवला आहे. दंंडाधिकारी न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज सुनावली. कुंद्राने त्याच्या अटकेला आव्हान देणारी याचिका एड रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत केली आहे. पोलिसांनी जप्त केलेला व्हिडीओचा कंटेंट हा पोर्नोग्राफी व्याख्येत बसत नाही. संबंधित कंटेंट या शॉर्ट फिल्म्स असून एका विशिष्ट वर्गासाठी तयार केलेल्या आहेत, असे यामध्ये म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.