raj kundra shilpa shetty file image
मुंबई

पॉर्नमधुन राज कुंद्राने २०२३-२४ मध्ये ३४ कोटी कमावण्याचं ठेवलं होतं लक्ष्य - पोलीस

आरोपपत्रातील माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये एकूण 146,00,00,000 उत्पन्न तसचं 30,42,01,400 नेट प्रॉफीट कमावेल, असा अंदाज बांधण्यात आला होता.

दीनानाथ परब

मुंबई: उद्योजक राज कुंद्राचा (Raj kundra) सहभाग असलेल्या पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai police) पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपात्रात वर्ष २०२३-२४ मध्ये किती उत्पन्न मिळवणार, त्याचं प्रेझेंटेशन केल्याची माहिती आहे. बॉलिफेम मीडिया लिमिटेडसाठी (bollyfame media) हे प्रेझेंटेशन असण्याची शक्यता आहे. आरोपपत्रातील माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये एकूण 146,00,00,000 उत्पन्न तसचं 30,42,01,400 नेट प्रॉफीट (net profit) कमावेल, असा अंदाज बांधण्यात आला होता. (Raj kundra for year 2023-24 target was Rs 34 crore Cops dmp82)

हॉटशॉट वरुन कंटेट येथे वळवण्याचा भाग प्लान बी म्हणून राज कुंद्राने बॉलिफेम कंपनी स्थापन केल्याचा आरोप आहे. लंडन स्थित केरनीन लिमिटेड कंपनी हॉटशॉट अ‍ॅपच संचालन करत होती. धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे गुगल आणि अ‍ॅपलने हे अ‍ॅप आपल्या सिस्टिममधून काढून टाकले. बॉलिफेमची निर्मिती दिलासा असल्याचं, सहआरोपी उमेश कामतने म्हटलं होतं. राज कुंद्राच्या व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधून या गोष्टी उघड झाल्या आहेत. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

२०२१-२२ या वर्षात 36,50,00,000 एकूण उत्पन्न मिळेल तसेच 4,76,85,000 नेट प्रॉफीटचा प्रेझेंटेशनमध्ये अंदाज बांधण्यात आला होता. बॉलिफेम किंवा अन्य कुठल्या कंपनीसाठी हे प्रोजेक्शन होतं, ते आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलेलं नाही. "पहिलं आरोपपत्र आम्ही दाखलं केलं, तेव्हा कुंद्राला अटक केली नव्हती. तपासात प्रगती होईल तसं, बॉलिफेमबद्दल अधिक स्पष्ट माहिती समोर येईल. पुरवणी आरोपपत्रात आम्ही या गोष्टी नमूद करु" असं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा मुंबईतून बॉलिफेमचं काम पाहत होता आणि हॉटशॉटवरुन बहुतांश कंटेट बॉलिफेमवर ट्रान्सफर करण्यात आला होता. पुढे तपासात जशी प्रगती होईल, त्यातून आणखी अनेक धक्कादायक गोष्टी उघड होऊ शकतात.

सध्या तुरुंगात असलेल्या राज कुंद्राने (Raj Kundra) पोलीस कोठडीला आव्हान देत जामिनावर सुटका करण्याची मागणी केली आहे. राज कुंद्राच्या या जामीन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी होणार आहे. अश्लील व्हिडिओ प्रकरणात राज कुंद्राला अटक झाली असून सायबर गुन्हे पोलीस (cyber crime police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांच्या संपत्ती शाखेने १९ जुलैला राज कुंद्राला अटक केली. अश्लील कंटेट बनवून त्याचे वितरण केल्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली. राज कुंद्राच्या वाढवण्यात आलेल्या पोलीस कोठडीची (police custody) मुदत आज संपणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT