Raj Thackrey Esakal
मुंबई

Raj Thackrey: कल्याण लोकसभेवर मनसेच्या इंजिनला थांबा? पाडव्याचा मुहूर्त राज ठाकरे साधणार का?

Raj Thackrey: कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून दावा केला जात असतानाच या मतदारसंघात मनसेच्या इंजिनला थांबा मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून दावा केला जात असतानाच या मतदारसंघात मनसेच्या इंजिनला थांबा मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. आमदार राजू पाटील यांच्यासाठी हा मतदार संघ सोडायची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याविषयीचा एक संदेश समाज माध्यमातून जोरदार व्हायरल होत आहे.

येत्या पाडव्याला राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच या संदेशामुळे पाडव्याला राज ठाकरे मुहूर्त साधणार का ? असे ही बोलले जात आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात उभाठा घटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. महायुतीकडून अद्याप येथे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीतच कल्याण लोकसभेची उमेदवारी जाहीर व्हायला हवी होती. ती न झाल्याने शिंदे यांच्यापुढे भाजपचे आव्हान कायम असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी जरी शिंदे यांना मदत करण्याचे जाहीर करत असले तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मात्र भाजपच्या बैठकांना उपस्थिती न लावत आपली नाराजी जाहीर करत आहेत. कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण मतदारसंघात उघड उघड भाजपकडून शिवसेनेला विरोध केला जात आहे.

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दिल्लीला जाऊन आल्यानंतर मनसे महायुती सोबत असल्याचे व दोन जागांवर ठाकरे दावा करतील असे देखील बोलले जात होते. मात्र त्यानंतर मनसेने चुप्पी साधल्याने चित्र अद्याप स्पष्ट नाही. त्यातच राज ठाकरे हे गुढी पाडव्याला मनसेच्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या वतीने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये " 9 एप्रिलला शिवतीर्थावर या नक्की, काय घडलंय हे सांगायचं आहे." असे म्हटले आहे त्यामुळे यंदाच्या पाडव्याच्या मेळव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

त्यातच मनसेच्या वतीने आणखीन एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या संदेशात"कल्याण मध्ये श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका. कल्याण लोकसभा मतदार संघ मनसेच्या प्रमोद (राजू) पाटील यांना सोडायची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे. श्रीकांत शिंदे हे आता ठाण्यातून लढणार आहेत. मनसेचा हट्ट, स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या विरोधाचा विचार करून भाजपा पक्ष श्रेष्ठींना शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांना मनवण्यात यश आले आहे. त्यामुळे आता कल्याणात उबाठा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर - राणे व मनसे च्या राञू पाटलांमध्ये थेट लढत होणार अशी शक्यता आहे. येणाऱ्या एक दोन दिवसात यावर शिक्कामोर्तब होईल.

असा हा संदेश असून या संदेशामुळे मनसेच्या गटामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कल्याण लोकसभेवर मनसेच्या इंजिनला थांबा मिळणार का ? पाडव्याला राज ठाकरे नक्की काय सांगणार, ते आपल्या उमेदवारांची घोषणा करणार का, मनसे पक्ष लोकसभा निवडणूक लढणार का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT