Political Reactions to Mumbai's Toll Waiver:
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत, ज्याची निवडणूक आयोगाकडून केव्हाही घोषणा होऊ शकते. अशात एकनाथ शिंदे सरकारने मुंबईतील सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता मुंबईतील टोलनाक्यांवर सरकारने हलक्या वाहनांचा टोल माफ केला आहे.
या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे एक्सवर पोट करत मुंबईकरांचे अभिनंदन केले आहे. असे असले तरी सरकारने घेतलेला हा निर्णय फक्त निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, असेही ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
"मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे खूप खूप अभिनंदन," असे म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टची सुरुवात केली.
"पण असो... किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी," असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारच्या टोल माफीच्या निर्णयावर शंकाही उपस्थित केली आहे.
महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.राज ठाकरे, मनसे प्रमुख
मिळालेल्या माहितीनुसार, आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबईत येणाऱ्या कोणत्याही हलक्या वाहनाकडून आता टोल वसूल केला जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आज रात्रीपासूनच वाशी, मुलुंड, ऐरोली, दहिसर आणि आनंदनगर टोलनाक्यांवर कोणत्याही हलक्या वाहनाला कर भरावा लागणार नाही. यामध्ये कार, टॅक्सी, जीप, लहान ट्रक, व्हॅन आणि डिलिव्हरी व्हॅन इत्यादींचा समावेश आहे. आज रात्रीपासून या वाहनांवर कोणताही टोल लागणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.