राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठकांना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपली. त्यानंतर आता निवडणूक होणार, हे देखील स्पष्ट झालं. त्यामुळे आमदारांना स्वत:कडे वळवण्यासाठी खलबतं सुरू झाली आहेत. (Devendra Fadnavis News)
महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं. मात्र फडणवीसांनी काऊंटर ऑफर दिल्याने ही बोलणी फिस्कटली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विविध मंत्र्यांवर स्थानिक पातळीवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. यासाठी दिल्लीतून सेटिंग लावण्याचं काम सुरू आहे. यासाठी केंद्रातून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव मुंबईत दाखल झाले आहेत. (Rajyasabha Election 2022)
दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सर्व पक्षांना अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे अपक्षांच्या मतांवर दिल्लीचा रस्ता सुकर होणार, हे स्पष्ट आहे. यासाठी शिवसेनेतर्फे खासदार राजन विचारे आणि आमदार सुनिल राऊत यांच्या शिष्टमंडळाने बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत चार तास चर्चा केली. बंद दाराआड चर्चा झाल्याने सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र कौटुंबीक बाबींवर अधिक चर्चा झाल्याचं नेत्यांनी सांगितलं.
सध्या पालघरमध्ये ठाकूर यांच्या पक्षाचे तीन आमदार असून त्यांना स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. त्यासाठी शिवसेनेतर्फे खासदार राजन विचारे आणि संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी सूत्र हलवायला सुरुवात केली आहे.
राज्यसभा निवडणूक असल्याने सर्वजण येत असतात, अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली. काल धनंजय महाडिक आले होते, असं त्यांनी म्हटलं. मात्र राज्यसभेसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा हे योग्य वेळी जाहीर करू, असं ते म्हणाले.
सहा जागा... सात उमेदवार.... आणि घोडेबाजार!
महाराष्ट्रातील सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने सातवा उमेदवार देऊन निवडणुकीत चुरस वाढवली आहे. मात्र यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. अपक्ष आमदारांच्या मतांवर दिल्लीचा मार्ग ठरणार असल्याने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. ८ ते १० जून दरम्यान मतं फूटू नये यासाठी मविआ सरकार आमदारांना हॉटेलवर ठेवणार असल्याचं समजतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.