महाराष्ट्रातील शहरे अ, ब आणि क अशा तीन वर्गात विभागण्यात आली आहेत
मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी (Treatment) खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्यासवा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा (Relief) देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित (Rates Finalized) करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या अधिसूचनेला मंजूरी दिली असून शहरांच्या वर्गीकरणानुसार (City Classification) दरआकारणी केली जाणार आहे. याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली. (Rajesh Tope Reaction on Finalized rates of Covid Treatment in Private Hospitals City Classification System)
"दर निश्चिती आणि शहरांची वर्गवारी हा राज्य शासनाने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय आहे. कोरोना उपचारांसाठी खासगी रुग्णालयातील दरांबाबत आपण काही निर्णय घेतले होते. पण मुंबईसाठी निश्चित केलेले दर हे छोट्या शहरात कोरोना हॉस्पिटलसाठी बरोबर नाहीत. त्यामुळे आम्ही आज चर्चा करून हे दर कमी करण्याचा निर्णय घेतला", अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
"नव्या नियम व वर्गवारीमुळे साधारण वॉर्ड हा 4 हजारांवरून B क्लास सिटीमध्ये 3 हजार केला आहे. तालुका हॉस्पिटल 2400 रुपये ICU दर 7500 वरून B क्लासमध्ये 5 हजार 500 आणि क मध्ये आणखी कमी आहे. तरीदेखील यापेक्षा काही वेगळा विषय असेल तर आम्ही चर्चा करू", असेही ते म्हणाले.
कोरोना आणि लहान बालकांच्या मुद्द्यावर...
"अनेक जिल्ह्यात सध्या 7 ते 8 टक्के एकूण रुग्ण आहेत. त्यात काही बालक रूग्ण आढळत आहेत. त्यांची योग्य ट्रीटमेंट केली जात आहे. त्यामुळे चिंता करण्यासारखं काहीही नाही. महत्त्वाचे म्हणजे या वयोगटात जिवीतहानी नाही ही दिलासादायक बाब आहे. सगळ्या गोष्टींवर लहान मुलांचा टास्क फोर्स अभ्यास करत आहे", असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.