warli painting sakal media
मुंबई

वारली चित्रशैलीतील रामायण राष्ट्रपती भवनात ; चित्रकलेला मिळाला राजाश्रय

संदीप पंडित

विरार : पालघर जिल्ह्यातील (palghar) वारली चित्रकला (warli painting) यापूर्वीच साता समुद्रपार गेली आहे. असे असले तरी या चित्रकलेला राजाश्रय मिळत नव्हता आता हि चित्रकला थेट राष्ट्रपती भवनात (presidents house) विराजमान झाल्याने तिला राजाश्रय मिळणार असल्याने याठिकाणचे वारली चोत्तरकार आनंदी झाले आहेत, डहाणू येथील (dahanu) चित्रकार हरेश्वर वनगा (hareshwar vanga) यांनी वारली चित्रशैलीमध्ये चितारलेले संपूर्ण रामायणाचे (ramayana painting) चित्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) यांना नुकतेच सादर केले . यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वारली चित्रशैलीचे कौतुक केले असून हे चित्र आता राष्ट्रपती भवनात विराजमान होणार आहे.

अयोध्येमध्ये गतवर्षी ५ ऑगस्ट रोजी भव्य श्रीराम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकराव चौगुले यांनी वारली चित्रशैलीमध्ये संपूर्ण रामायण चितारले जावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर डहाणू येथील वनवासी कल्याण प्रकल्पातील माजी विद्यार्थी आणि वारली चित्रकार हरेश्वर वनगा यांनी संपूर्ण रामायण वारली चित्रशैलीत चितारण्याची जबाबदारी स्विकारली. या चित्रामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ, रामायणातील महत्वाच्या घटनांसह लंकादहन, रावण वध आणि श्रीरामचंद्रांचे अयोध्येत पुनरागमन असे प्रसंग चितारण्यात आले आहेत.

वारली चित्रकलेमध्ये संपूर्ण रामायण चित्रणयासाठी वनगा यांनी दोन महिने मेहनत घेऊन ६x४ या आकारात हे चित्र साकारले. त्यानंतर बुधवारी राज्यसभा सदस्य आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, परिषद सल्लालाग समितीचे सदस्य विनोद पवार आणि वारली चित्रकार हरेश्वर वनगा यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे चित्र सादर केले.

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चित्राचे आणि वारली चित्रशैलीचे कौतुक केले. खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी वारली चित्रशैलीचा विकास करण्यासाठी आणि कलेस प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले. तसेच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वारली चित्रशैलीचे कौतुक करून सन्मान केल्याचे चित्रकार हरेश्वर वनगा यांनी सांगितले. यापूर्वी वारली चित्रकला साता समुद्रपार नेण्याचे श्रेय पदमश्री जिवा म्हशा यांना जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT