मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात (phone tapping case) पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS rashmi shukla) यांच्या विरोधात पोलिसांकडे कोणतेही पुरावे (evidence) नाहीत, केवळ त्याची कागदपत्रे (documents) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मिडियापुढे (media) उघड केली म्हणून राज्य सरकारचा (government) शुक्ला यांच्यावर राग आहे, असा आरोप आज शुक्ला यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) करण्यात आला.
फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरोधात बीकेसी सायबर विभागात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शुक्ला यांची चौकशी देखील सुरू केली आहे. याविरोधात त्यांनी एड महेश जेठमलानी यांच्या मार्फत न्यायालयात याचिका केली आहे. आज न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला पण चौकशी मात्र शुक्ला यांची करतात, खरे तर फोन टैपिंग साठी अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची रितसर परवानगी शुक्ला यांनी घेतली होती. मात्र त्यांनी पोलीस बदल्यासंबंधित केलेल्या अहवालामुळे राज्य सरकार नाराज आहे, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.
हा अहवाल संवेदनशील आहे, पण आता सगळा दोष शुक्ला यांच्यावर टाकून कुंटे स्वतःला बचावत आहेत आणि शुक्ला यांना बळीचा बकरा बनवित आहेत, असा आरोप त्यांनी केला. खरेतर ही कागदपत्रे फडणवीस यांनी मिडियाला जाहीर केली म्हणून राज्य सरकारचा राग आहे हे सर्वांना ठाऊक आहे, असा दावाही यावेळी जेठमलानी यांनी केला. याचिकेवर शनिवारी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करु नये असे न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले. पोलीस बदल्यात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची माहिती शुक्ला यांनी अहवालात दाखल केली आहे. सध्या त्या हैदराबादमध्ये कर्तव्यावर आहेत. या फोन टैपिंग प्रकरणात सरकारी अधिकारी मला अडकवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.