Ratan Tata Death : टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे काल वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी भारतीय उद्योगक्षेत्रात एक अतुलनीय वारसा सोडला आहे. बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.टाटा यांच्या निधनाचे वृत्त पसरताच भारतीय क्रिकेटपटूंनीही श्रंद्धांजली वाहिली. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांच्यासह भारतीय क्रिकेटपटूंनी तसेच क्रिकेट क्षेत्रातील इतरांनी टाटा यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या.
रतन टाटा यांनी न्यूयॉर्कमधील इथाका येथील कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले. १९६२ मध्ये भारतात परतल्यानंतर टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये शॉप फ्लोअरवर काम करून कारकिर्दीची सुरुवात केली.त्यांना समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये मोलाचा अनुभव मिळाला आणि त्यांना प्रभारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. एका दशकानंतर टाटा यांनी टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्षपद स्वीकारले आणि १९९१ मध्ये त्यांचे काका जेआरडी टाटा यांच्यानंतर टाटा समूहाचे ते अध्यक्ष झाले.
सचिन तेंडुलकरने ट्विट केले की,'रतन टाटा यांच्यासोबत वेळ घालवण्याचे भाग्य मला लाभले, पण लाखो लोकं जे त्यांना कधीच भेटले नाहीत, त्यांचे दु:ख आज मला समजते, असा त्यांचा प्रभाव आहे. प्राण्यांवरील प्रेमापासून ते परोपकारापर्यंत, त्यांनी दाखवून दिले की खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण त्यांची काळजी घेतो.
सोन्याचे हृदय असलेला माणूस. अशी व्यक्ती जी इतरांच्या भल्यासाठी झटली आणि आयुष्य जगले. सर, तुम्ही कायमस्वरूपी स्मरणात राहाल, असे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ट्विट केले.
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरिमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल. दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. सायंकाळी ४ वाजता मरिन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड करत ही अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत पोहचेल. सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.