Stray dogs get digital identification  
मुंबई

Mumbai : रतन टाटा यांच्या ऍनिमल वेल्फेअरचा भन्नाट उपक्रम! भटक्या श्वानांना QR कोडसह मिळाली डिजिटल ओळख

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रतन टाटा यांचे ऍनिमल वेल्फेअर स्टार्टअप मोटोपॉव्स आणि पॉवफ्रेंड्स यांनी भटक्या श्वानांचे बेकायदेशीरपणे स्थलांतरण रोखण्यासाठी आणि रस्त्यावरील कुत्र्यांना डिजिटल ओळख प्रदान करणे हा या उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांअंतर्गत संस्थेने प्रायोगिक तत्वावर १०० भटक्या कुत्र्यांचे कॉलर टॅगिंग केले आहे.

pawfriends.in द्वारे बनवलेले क्यूआर कोड असणारे टॅग कुत्र्याच्या मूळ परिसराचा, लसीकरण आणि नसबंदीची स्थिती, वैद्यकीय इतिहास आणि स्थानिक काळजीवाहूंचा तपशील यांचा संपूर्ण माहिती देऊ शकतात. ही संकल्पना pawfriends.in च्या अक्षय रिडलान यांनी सर्वप्रथम मांडली. ज्यांनी भटक्या कुत्र्यांचा डेटा संग्रहित करण्यासाठी डिजिटल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर देखील तयार केले.

मोटोपॉव्सचे तळागाळात असेलेले काम, अनुभवी स्वयंसेवक आणि गेल्या काही वर्षांपासून भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षिततेबाबत आलेले अनुभव आणि दर्जेदार तंत्रज्ञान असणारे कॉलर यांच्या मदतीने ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर अमलात आणता येईल असा त्यांचा विश्वास आहे.

मोटोपॉजने २०१५ मध्ये पहिल्यांदा डिजिटली नेटिझन्समध्ये लोकप्रियता मिळवली. त्यावेळी त्यांनी भटक्या कुत्र्यांचे अपघात रोखण्यासाठी रिफ्लेक्टीव्ह कॉलर लाँच केले. आज हा ब्रँड शहरातील भटक्या जनावरांच्या सुरक्षिततेसाठी उत्तम पर्याय म्हणून लोकप्रिय होतो आहे.

या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोटोपॉव आणि pawfriends.in रस्त्यावरील कुत्र्यांना त्यांची स्वतःची ओळख देईल, बेकायदेशीर स्थलांतरण थांबविण्यासाठी सुरक्षा प्रदान करेल.

रस्त्यावरील कुत्र्यांवर हिंसाचार आणि पॅक अटॅक यामुळे या कुत्र्यांचे मृत्यू होतात. मोटोपॉव आणि pawfriend.in ने टॅग स्कॅन केल्याने स्थानिक फीडरला कुत्रा कोठून आला आहे हे ओळखता येईल. यामुळे त्यांचे बेकायदेशीर स्थलांतर रोखले जाईल. तर हे रिफ्लेक्टीव्ह कॉलर रात्री ५०० मीटर अंतरावरूनही चमकत असल्याने कुत्र्यांचे रस्त्यावरील अपघाती मृत्यूपासून संरक्षण करणे शक्य आहे. अशा संघटना शहरातील भटक्या प्राण्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

- शंतनू नायडू, संस्थापक, मोटोपॉज

"हे क्यूआर टॅग सर्व भटक्या कुत्र्यांना डिजिटल ओळख देत आधार कार्ड म्हणून काम करतील."

- अक्षय रिडलान, संस्थापक, पॉवफ्रेंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सॉफ्टवेअर इंजिनिअरने स्वत:ला विजेचा शॉक देऊन संपवलं जीवन... कामाच्या दबावामुळे होता नैराश्यात! पोलिसांची धक्कादायक माहिती

IND vs BAN 1st Test : ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं; Team India साठी ठरला ऐतिहासिक विजय

शतक अन् ६ विकेट्स! R Ashwin ने घरचं मैदान गाजवलं; कर्टनी वॉल्श यांचा विक्रम मोडला, तर शेन वॉर्नशी बरोबरी

Latest Maharashtra News Live Updates: सत्यपाल मलिक यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

Tumbbad 2 : तुंबाड 2 मधून दिग्दर्शक राही अनिल बर्वेची एक्झिट ; केली नव्या दोन प्रोजेक्टसची घोषणा

SCROLL FOR NEXT