मुंबई : कोरोना विषाणूने आतापर्यंत पुणे महापालिकेच्या हद्दीत 12 टक्क्यांहून अधिक रुग्णांचा बळी घेतला असून, मुंबईत हे प्रमाण 7 टक्के आहे. देशात आतापर्यंत 3.35 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता राज्यातील लक्षणे नसलेल्या रुग्णांचेही प्रमाण वाढू लागले आहे.
महाराष्ट्रात 13 एप्रिलला सकाळपर्यंत कोरोनाचे 1996 रुग्ण आढळले आणि 148 जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरना रुग्णांच्या मृत्यूचा दर 7.41 टक्के आहे. मुंबईत सोमवार सकाळपर्यंत 1298 रुग्णांची नोंद झाली; त्यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात कोरोनाचे 233 रुग्ण आढळले आणि 30 जण दगावले.
तामिळनाडू आणि दिल्ली येथे 1000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले; मात्र मृत्युदर देशापेक्षा कमीच आहे. मृत्यूचे प्रमाण दिल्लीत 2.08 टक्के, तर तमिळनाडूत 1.05 टक्के आहे.
राज्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहेत. सुमारे 84 टक्के म्हणजे 991 रुग्णांमध्ये कोरोनाबाधेची लक्षणे दिसत नव्हती. हे प्रमाण 6 एप्रिलला 71 टक्के आणि 3 एप्रिलला 67 टक्के होते.
दादरमध्ये कोरोनाचे 13 रुग्ण
वरळी, प्रभादेवीनंतर आता दादरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी पुन्हा दादरमध्ये दोन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या 13 झाली आहे. रविवारी दादर कामगार स्टेडियम पाठीमागील आंबेडकर नगर वसाहतीतील 52 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर दादरमधील कासारवाडी चाळीतील 48 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून आंबेडकर नगर व कासारवाडी चाळ सील करण्यात आली आहे. तसेच, इमारतीतील सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
rate of corona deaths is on higher side in mumbai and pune compared to other states of india
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.