मुंबई

26/11 Mumbai attack:चूक नेमकी कोणाची? ताज वरील हल्ल्यानंतर 'रॉ' चीफ देणार होते राजीनामा

रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे सचिव अशोक चर्तुवेदी यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या (Terror attack) आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. समुद्रमार्गे पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी हल्ला केला होता. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात १६६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. २९३ जण जखमी झाले होते. या भयाण हल्ल्याच्या स्मृती मुंबईकरांच्या मनात कायमस्वरुपी कोरल्या गेल्या.

हा हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याचदिवशी 27 नोव्हेंबर २००८ रोजी रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे सचिव अशोक चर्तुवेदी यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल तत्कालिन 'रॉ' प्रमुखांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयबा आणि ISI ने मिळून हा दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

या २६/११ हल्ल्यासंबंधी 'रॉ' ला अलर्ट्स मिळाले होते आणि त्यांनी ते आयबीला पाठवले होते. अशोक चर्तुवेदी यांनी ते अलर्ट्सही दाखवले होते. विशेष सचिव अनिल धसमाना यांनी आयबीला विशेष अलर्ट्सही दिले होते. या अलर्टसाठी सीआयए आणि इस्रायलच्या मोसादचीही मदत घेण्यात आली होती. रॉ ने जारी केलेल्या अलर्टच्या यादीत नरीमन हाऊसचा स्पष्ट उल्लेख होता.

२६/११ हल्ल्याच्यावेळी दहशतवाद्यांनी नरीमन हाऊसला लक्ष्य केलं होतं. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी २० नोव्हेंबर २००८ रोजी अलर्ट जारी केला होता. कराची बंदरातून हे १० दहशतवादी अल हुसैनी बोटीतून निघाले होते. त्यांनी एमव्ही कुबेर या ट्रॉलरचं अपहरण करुन ते बोटीतून मुंबईत दाखल झाले.

पंतप्रधानांनी राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला?

यानंतर R&AW ने सर्व संभाव्य लक्ष्यांची यादी तयार केली. 20 नोव्हेंबर रोजी भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला अलर्ट पाठवण्यात आला होता. कराचीहून निघालेल्या अल हुसैनी जहाजाबाबतही माहिती देण्यात आली. जहाजाचे अचूक पॉईंट्स दिले गेले. पण दहशतवाद्यांनी मुंबई बंदराबाहेरून एमव्ही कुबेर या फिशिंग ट्रॉलरचा वापर केला होता.

अशोक चतुर्वेदी यांचे २०११ मध्ये निधन झाले. असे मानले जाते की PM मनमोहन सिंग यांनी R&AW च्या अलर्टसची चौकशी केल्यानंतर त्यांना राजीनामा न देण्यास सांगितले. हल्ला न थांबल्याने अशोकला लक्ष्य केले जात होते. जानेवारी 2009 मध्ये ते एजन्सीतून निवृत्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT