मुंबई

'मी पुन्हा येईन..' वर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण, म्हणालेत..

सकाळ वृत्तसेवा

'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..' हे वाक्य आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवढं ट्रोल केलं गेलं, तेवढं कदाचित कुणालाच ट्रोल केलं गेलं नसेल. असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल ज्यावर याचं पारायण झालं नसेल. यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी  'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..' बद्दल खुलासा केलाय.   

देवेंद्र फडणवीस यांना, भाजपला अतिआत्मविश्वास नडला का? यावर उत्तर देताना फडणवीस यांनी उत्तर दिलं. 'मी पुन्हा येईन' ही कवितेची ओळ आहे. विधानसभेतील भाषणात मी त्याचा उल्लेख केला होता. लोकांना ही ओळ लोकांना भावली, त्यामुळे सर्वत्र पसरली. त्यामुळे  'मी पुन्हा येईन' ही माझी घोषणा म्हणजे माझा गर्व नव्हता, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 

गेल्या पाच वर्षात मी एकही सुट्टी न घेता महाराष्ट्रातील जनतेची सेवा केलीये, याचं मला समाधान आहे. 'मी पुन्हा येईन' बोलण्यामागे महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणे एवढाच हेतू होता, असं देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर जे सत्तानाट्य झालं ते सर्व महाराष्ट्राने पाहिलं. यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची सविस्तर मुलाखत दिलीये. यामध्ये फडणवीस यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलंय. 

Webtitle : reaction of devendra fadanavis on mi punha yein statement   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतसाठी खजिना उघडणारा लखनऊ सुपर जायंटचा मालक कोण? किती आहे संपत्ती?

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

Kolhapur: पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT