मुंबई

वीर्य आणि अंडकोषात कोरोना विषाणू आढळू शकतो? लैंगिक संक्रमणाद्वारे कोविड-19 पसरतोय?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लैंगिक संक्रमणाद्वारे कोविड -19चा प्रसार होण्याची शक्यता नसल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार पुरुषांच्या वीर्य किंवा अंडकोषात कोरोनाव्हायरसशी संबंधित कोणताही पुरावा सापडलेला नाही. 'फर्टिलिटी ऍण्ड स्टेरिलिटी' या जर्नलमध्ये याबाबतचा एक अभ्यास लेख प्रकाशित करण्यात आला होता. मात्र या लेखात लैंगिक रोगातून कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता आहे असे ठामपणे म्हटलेले नव्हते. तथापि, या मर्यादित शोधाच्या आधारे असा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे काही संशोधकांनी सांगितले.

"या प्राथमिक अभ्यासात कोविड 19 या संसर्गाचे विषाणू टेस्ट किंवा वीर्यामध्ये दिसून येत नाही हा एक महत्त्वाचा शोध असू शकतो असे  यूएस मधील उटाह युनिव्हर्सिटीतील सहयोगी प्राध्यापक जेम्स एम होटलिंग यांनी सांगितले. “कोविड -19  सारख्या आजारांत जर का लैंगिक संबंधातून संसर्ग झाला असता तर त्या रोगाचा प्रतिबंध करणे फार अवजड झाले असते. शिवाय त्याचा गंभीर परिणाम एखाद्या मनुष्याच्या  दीर्घकालीन  आरोग्यावर झाला असता” असे ही होटलिंग पुढे म्हणाले. 

सार्स, कोविड-2, कोविड-19 साठी कारणीभूत ठरलेला व्हायरस हा इबोला, झिका आणि इतर उदयोन्मुख व्हायरल रोगांप्रमाणे याने देखील लैंगिक संसर्ग होऊ शकतो या चिंतेतून चीन आणि अमेरिकेच्या संशोधकांनी हा अभ्यास सुरू केला. कोविड-19 च्या सौम्य ते मध्यम प्रकरणांचे निदान झालेल्यांपैकी त्यांनी एका महिन्यात 34 चीनी पुरुषांकडून वीर्य नमुने गोळा केले, पण त्यांना प्रयोगशाळेतील चाचण्यांतील जमा वीर्य नमुन्यांमध्ये सार्स-कोविड -2 आढळले नाही, असे संशोधकांना आढळले.

तथापि, विद्यमान वीर्यामध्ये विषाणूचा अस्तित्व नसल्यामुळे शुक्राणू पेशी तयार होतात त्या टेस्टमध्ये ही त्याने प्रवेश केलेला नाही, हे संशोधन महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. उटाह विद्यापीठातील हंट्समन कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील पोस्टडॉक्टोरल वैज्ञानिक जिंगताओ गुओ म्हणाले, “जर विषाणू चाचणीत असेल परंतु शुक्राणूंमध्ये नसेल तर तो लैंगिकरित्या संक्रमित होऊ शकत नाही.“परंतु हे अंडकोषात असल्यास वीर्य व शुक्राणूंच्या उत्पादनास दीर्घकालीन नुकसान होते,” असे गुओ म्हणाले.

अभ्यासकरण्यासाठी, संशोधकांनी निरोगी तरुण अवयव दात्यांकडून एका सेल एमआरएनए मधून तयार केलेल्या आणि पूर्वी पासून उपलब्ध असलेल्या डेटासेटचे विश्लेषण केले.या अटलास मधून त्यांना कोणत्याही एका अंडकोष पेशीमध्ये, प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जाणारी अनुवांशिक सामग्री एमआरएनए तपासण्याची परवानगी देते.या प्रकरणात, वैज्ञानिकांनी एसएआरएस - कोविड -2 शी संबंधित जीन्सच्या जोडीच्या अभिव्यक्तीचे परीक्षण करण्यासाठी याचा उपयोग केला.

विषाणूंनी सेलमध्ये प्रभावीपणे प्रवेश करण्यासाठी, दोन्ही रिसेप्टर्स एकाच सेलमध्ये असणे आवश्यक आहे.जेव्हा वैज्ञानिकांनी डेटासेटची तपासणी केली तेव्हा त्यांना आढळले की या दोन प्रथिने एन्कोड करणारी जीन्स केवळ 6500 टेस्टिक्युलर पेशींपैकी केवळ चारमध्ये आढळली आहेत, त्यामुळे सार्स-कोविड  -2  मानवी अंडकोष पेशींवर आक्रमण करण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले. हे निष्कर्ष असूनही, संशोधकांनी कबूल केले की त्यांच्या अभ्यासाकडे अनेक महत्त्वाच्या मर्यादा आहेत ज्यात एक लहान नमुना आकार आहे आणि दात्यांपैकी कोणीही कोविड -19 मध्ये गंभीर आजारी नव्हते.

"कोविड -19 संसर्गाने गंभीर आजारी असलेल्या माणसाला जास्त प्रमाणात विषाणूची कमतरता असू शकते ज्यामुळे वीर्य संक्रमित होण्याची शक्यता जास्त असते.मात्र सध्या आमच्याकडे आत्ता याचे उत्तर नाही." असे होटलिंग म्हणाले

परंतू सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या आजारातील रुग्ण या आजारातून बरे होत आहेत असे देखील अभ्यासाच्या निष्कर्षातून स्पष्ट होत नसल्याचे ते म्हणाले.

तथापि, घनिष्ठ संपर्क,  खोकला, शिंकणे आणि चुंबन घेण्याद्वारे रोगाचा धोका वाढवू शकतो अशी चेतावणी हॉटलींग यांनी दिली आहे.

काही संसर्गग्रस्त लोक रोगप्रतिकारक असतात आणि ते इतरांसमवेत व्हायरस देखील संक्रमित करतात, तसेच ते निरोगी दिसू शकतात असा इशारा ही त्यांनी पुढे दिला आहे.

read detail article related to STI and spread of corona virus infection

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT