मुंबई : बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी प्रसिध्द केलेल्या अहवालाच्या मुख पृष्ठावर नथुराम गोडसे यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले. बँकेच्या दैदिप्यमान ७० वर्षात कधीही असे घडलेले नाही. बँकेचा अहवाल कसा असायला हवा त्याचे नियम आहे.
त्याला छेद देत अहवाल छापण्यात आला, सभासदांना अधिक फायद्याचा वापर करण्यापेक्षा दहशतवादी प्रवृत्ती तयार करण्यासाठी होत असून बँक वाचविण्यासाठी आम्ही गांधीजी होण्यास तयार असल्याचा इशारा बँकेचे माजी सभासद व महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
राज्याच्या सर्वांगीण विकासात एसटीचा मोठा वाटा आहे. राज्यातील सर्व सामान्य माणसाचे एसटी हेच दळणवळणाचे मुख्य साधन आहे. महात्मा गांधीच्या संकल्पनेतील खेडी समृध्द करण्याचे काम एसटीने व एसटी कर्मचाऱ्यांनी केले आहे.
त्या कर्मचाऱ्यांच्या कष्टातून व घामावर उभ्या असलेल्या बँकेत गांधीजींचा सर्वसामान्य माणसाला समृध्द करण्याचा विचार सोडून त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या दहशतवाद्याची चित्रे छापून त्यांचा आदर्श घेऊन काम होणार असेल हे दुर्दैवी असल्याचेही बरगे यांनी म्हंटले आहे.
गांधीजींनी ग्रामीण विकासाला बळ दिले. कृषी ग्रामीण क्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक, रोजगारनिर्मितीचे महत्त्व गांधीजींनी अधोरेखित केले होते. त्यांच्या कल्पनेप्रमाणे जर प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाले तर भारताला फार मोठा आर्थिक विकास साधणे शक्य होईल. शहरी भागातील विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण खेड्यांकडे गेले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विकासात एसटीचा मोलाचा वाटा राहिला आहे. दळणवळण, मुलांचे शिक्षण, महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी, आदी विविध गोष्टी एसटीमुळे शक्य झाल्या. गाव तिथे एसटी हे घोषवाक्य नाहीतर ग्रामीण जीवनात एसटीचे महत्त्व अधोरेखित करणारे वाक्य असल्याचे बरगे यांनी म्हटले.
२२५ कोटीच्या ठेवी काढल्या
बँकेत सध्या २३०० कोटी रुपयांची ठेवी आहेत. त्यातील २२५ कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्या असून सी डी रेशो ८५ टक्क्याच्या वर गेला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर बँक अडचणीत येऊ शकते. त्याचा फटका सभासदांना बसू शकतो.
त्या मुळे ठेवीदार व सभासद यांच्यात निर्माण झालेला संभ्रभ दूर करण्याऐवजी हे असले विनाशकारी निर्णय घेतले जात आहेत.व जाब विचारणाऱ्याना दमदाटी केली जात आहे.हे या पुढे सहन केले जाणार नाही असेही बरगे यांनी म्हंटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.