मुंबई : मागीलवर्षी नोव्हेंबरचा महिना कमालीचा गाजला तो महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकांच्या कारणास्तव. महाराष्ट्रात निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत आणि महाराष्ट्रात एकावर एक राजकीय भूकंप होण्यास सुरवात झाली. अशात मागील वर्षी निवडणुकांच्या निकालानंतर काय काय घडलं याचा एक लहानसा रिकॅप.
- ऑक्टोबर २१, २०१९ : महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडलं
- ऑक्टोबर २४, २०१९ : निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. ज्यामध्ये भाजप १०५ त्यानंतर शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ तर काँग्रेसला ४४ जागांवर विजय
- नोव्हेंबर ९, २०१९ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेचा आमंत्रण दिलं, ४८ तसच अवधी देखील देण्यात आला.
- नोव्हेंबर १०, २०१९ : भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविली
- नोव्हेंबर १०, २०१९ : शिवसेनेकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकार स्थापन करण्यासाठी तयारी दर्शवली गेली. शिवसेनेने २४ तासांचा अवधी मागून बहुमताचे आकडे असल्याचं सिद्ध करू असं सांगितलं गेलं
- नोव्हेंबर ११, २०१९ : बहुमताचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगताना शिवसेनेने सरकार स्थापन करण्याचा दावा केला . पाठिंब्याची पत्रे देण्यासाठी तीन दिवसांची विनंतीदेखील राज्यपालांना केली
- नोव्हेंबर ११, २०१९ : राज्यपालांनी तीन दिवसांची मुदत देण्यास असमर्थता दर्शवली आणि शिवसेनेचा प्रस्ताव नामजूर केला. राज्यपालांनी त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले.
- नोव्हेंबर १२, २०१९ : शिवसेनेच्या सरकार स्थापनेच्या दाव्याला नकार देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आवाहन देण्यात आले.
- नोव्हेंबर १२, २०१९ : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
- नोव्हेंबर २२,१०१९ : महाविकास आघाडी स्थापन करून त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला
- नोव्हेंबर २३, २०१९ : महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट पहाटे ५.४७ मिनिटांनी हटवण्यात आली आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- नोव्हेंबर २३, २०१९ : महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनेबाबत भाष्य करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाणार नाही हे शरद पवारांकडून स्पष्ट करण्यात आलं
- नोव्हेंबर २५, २०१९ : सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं मंगळवारी देवेंद्र फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीबाबतचा निर्णय देण्यात येईल
- नोव्हेंबर २६, २०१९ : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या राज्यपालांना बहुमत चाचणी २७ तारखेला संध्याकाळी ५ वाजेआधी घेण्यात यावी आणि त्याचे लाईव्ह टेलिकास्ट करावे अशी सूचना करण्यात आली.
यांनतर बहुमताचा आकडा आपल्यासोबत नसल्याचे कारण देत अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यामंत्रीपदाचा त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने नसल्याने राज्यपाल भागातीसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रातील ८० तासांचे सरकार कोसळले. यांनतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली
recap of political happening occurred in november 2019 and how uddthav thakceray became CM
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.