मुंबई : संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्लाबोल करण्यात आला होता. दरम्यान, आंदोलनापूर्वी शरद पवार यांच्या घराची रेकी करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आंदोलनापूर्वी शरद पवार यांच्या घराची रेकी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या आंदोलनप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सर्व आंदोलक आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असल्याचेही समजत आहे. ( Reiki Was Done Before Silver Oak Agitation)
काल झालेले आंदोलन म्हणजे एक मोठ कटकास्थाना असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यातील एक म्हणजे पवारांच्या घराची रेकी करणे होय. ही रेकी नेमकी आंदोलनाच्या एकदिवस आधी की त्यापूर्वी याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, हाती लागलेल्या काही फुटेज हे सिल्व्हर ओक परिसरातील असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय आझाद मौदान परिसरातीलदेखील काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांपैकी काही जणांना पवार यांच्या घराशेजारी दिसून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यानुसार यातीत काहीजण पवार यांच्या घराची रेकी करण्यासाठी गेले होते असे पोलिसांचे मत आहे. दरम्यान, जी लोकं रेकी करण्यासाठी गेले होते त्यातील काही जण आंदोलनात नव्हते त्यामुळे नेमकी ही लोकं कोण होती याचीदेखील माहिती पोलिसांना मिळाली असल्याचे कळत आहे. तसेच ही लोकं आंदोलनामध्ये का नाही गेली याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याशिवाय आंदोलनामधील सर्वांचे स्मार्ट फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.
ST Strike : कायदा हातात घेतल्यानंतर कुणाचीही सुटका नाही : परब
शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्लाबोल करण्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांना (ST Strike Worker)भडकवल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कायदा हातात घेणाऱ्या कुणाचीची सुटका नसल्याचे म्हटले आहे.
परब म्हणाले की, न्यायालयाने निकाल दिला असून, कायदा हातात घेतल्यानंतर काय होते हे न्यायलयाच्या निर्णयानंतर दिसून आले आहे. तसेच कायदा हातात घेतल्यानंतर कुणाचीही सुटका नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच महिन्यांपासून ज्या मुद्द्यासाठी एसटी बंद आहे त्यातील एकाही मुद्द्यावर सदावर्ते यांना एकही समाधनकारक उत्तर सापडलेले नसल्याचे परब म्हणाले.
विलीनीकरण अमान्या झाले. त्याच बरोबर सातवा वेतन आयोग अमान्य झाला. न्यायालयाने केवळ कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. ते आम्ही यापूर्वीच सातवेळा दिले होते असे परव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. एसटीची सेवा पूर्ववत करण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचेही परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.