महाड : जिल्ह्यात राहणाऱ्या परराज्यातील मजूर व कामगारांना आपल्या गावी जाणे आता शक्य होणार आहे. ज्या कामगार, मजुरांना गावी जायचे असल्यास त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर स्वत:ची माहिती भरावी, असे आवाहन कामगार विभागातर्फे करण्यात आले आहे.
महत्वाची बातमी : जेएनपीटीतील बहुचर्चित 'SEZ' उभारणीबाबत महत्वपूर्ण निर्णय, रोजगार निर्मितीच्या आशा पल्लवीत
रायगड जिल्ह्यात महाड, माणगाव, रोहा, नागोठणे, रसायनी, खोपोली या भागात औद्योगिक क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणात कामगार या भागात आहेत. तसेच जिल्ह्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू असल्याने परराज्यातील मजूर या कामांवर आहेत. या कामगारांना गावी जाण्याची संधी आता आता उपलब्ध झालेली आहे. कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियमित रेल्वे सेवा 12 ऑगस्टपर्यंत स्थगित असल्याने स्थलांतरित मजुरांना आपली माहिती 12 ऑगस्टपर्यंत भरता येईल.
महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयात स्थापित सहाय्यता केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित सहाय्यता केंद्र, त्याचप्रमाणे कामगार विभागाच्या वर्तमान योजनांची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यात राहणाऱ्या परराज्यातील मजुरांनी त्यांना आपल्या गावी जायचे असल्यास त्यांची माहिती संबंधित संकेतस्थळावर भरावी, असे आवाहन कामगार उपायुक्त पी. एन. पवार यांनी केले आहे.
(संपादन : वैभव गाटे)
relief to the workers who want to go to the village read detail story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.