मुंबई : दहिसर येथून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी 24 तासांच्या आत शोधून काढले असून त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा भेट घालून दिली. ही मुले दहिसरच्या बबलीपाडा येथील घर सोडून आई-वडिलांना न सांगता भाईंदर येथील ख्रिसमस निमित्त कार्यक्रमात गेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी 28 डिसेंबर रोजी घडली. 5, 7 आणि 10 वर्षे वयोगटातील ही मुले आहेत. मुलांच्या पालकांनी हे तिघे बेपत्ता असल्याची तक्रार करण्यासाठी दहिसर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी तक्रार नोंदवत तपसासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली .पोलिसांकडून माहिती मिळवण्यासाठी मुलांचे फोटो पोलिसांशी संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित केले.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असता त्यांना कळले की मुले दहिसर रेल्वे स्थानकावर गेली होती आणि तेथून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढली होती. भाईंदर पोलीसाना तीन मुले एका मॉल जवळ असल्याची माहिती मिळाली.
पोलीस लागलीच मॅक्स मॉलजवळ पोहोचले आणि मुलांना ताब्यात घेतले. नंतर मुलांना सुखरूप त्यांच्या पालकांपर्यंत पोलिसांनी पोहचवले. मुलांची विचारपूस केली त्यांना भूक लागली पण घरी कसे जायचे ते समजत नव्हते. अंधार पडल्यावर ते मॉलच्या आवारात झोपले असल्याचे मुलांनी सांगितले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.