कल्याण रेल्वे स्थानकाजवळ प्रशासनाने उभारलेली भिंत  
मुंबई

कल्याण स्थानकाजवळील भिंतीसाठी रहिवासी आक्रमक 

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सांगळेवाडी परिसरात अंतूदेवी दुबे या तरुणीला लोकलची धडक बसल्याने बुधवारी (ता. 8) मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या ठिकाणी रेल्वे रूळ आणि निवासी वस्तीदरम्यान संरक्षक भिंतीचे काम अर्धवट ठेवल्याने मागील काही महिन्यांपासून सांगळेवाडी परिसरातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्थानिक रहिवासी स्वप्नील रोकडे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल तसेच संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या समस्येकडे लक्षही वेधले आहे. मात्र, बुधवारच्या घटनेत तरुणीचा नाहक बळी गेल्याने स्थानिक रहिवाशांनी रेल्वे प्रशासनाचा एकत्र येऊन निषेध केला. 

सांगळेवाडी परिसरात रहेजा संकुल, लोक उद्यान यांसारखी निवासी संकुले मागील दहा ते पंधरा वर्षात उभी राहिली आहेत. येथे साधारण पंचवीस हजारांची लोकवस्ती आहे. रेल्वेस्थानकाच्या लगत असलेल्या या परिसरात रेल्वेने सहा महिन्यांपूर्वी रुळालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम केले. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडले.

या परिसरातील नागरिक कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचण्यासाठी याच मार्गाचा वापर करत होते. आता 100 मीटर अंतरापर्यंत संरक्षक भिंत बांधल्यानंतर 50 फुटाचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. येथील नागरिक जीव धोक्‍यात घालून याच ठिकाणाहून रूळ ओलांडत कल्याण स्थानक गाठतात. 

सांगळेवाडी परिसर रेल्वे स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. मात्र रेल्वे रुळ ओलांडत हेच अंतर कमी मिनिटात गाठता येते. या "शॉर्टकट'पायी मागील सहा महिन्यात या परिसरातील सात ते आठ जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती रोकडे यांनी दिली.

बुधवारच्या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी गुरुवारी या ठिकाणी एकत्र येऊन आपला निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार प्रकाश भोईर, स्थानिक नगरसेवक प्रकाश पेणकर उपस्थित होते. नागरिकांच्या आंदोलनानंतर स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी यावर योग्य ती उपाय योजना केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. 

सांगळेवाडी परिसर रेल्वे स्थानकालगत आहे. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून आमची वहिवाट असलेला रस्ता बंद केला आहे. भिंत बांधल्यानंतर तिचे काम अर्धवट का सोडले गेले? हा प्रश्न आहे. रेल्वे स्थानकाबाहेर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा विचार करता या शॉर्टकटने जाणे अधिक सोयीचे ठरते. 
- आमना खान, 
स्थानिक रहिवासी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT