मुंबई

Mumbai BJP: मुंबई भाजपवर बंडाचे सावट? घाटकोपरच्या बड्या नेत्याकडून 'मित्र मंडळां'च्या बैठकीचा धडाका

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News Maharashtra Vidhan Sabha Elections 2024

भाजपचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांनी घाटकोपर (पूर्व) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे माजी मंत्री राहिलेले मेहता यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

प्रकाश मेहता मित्र मंडळाची रविवारी घाटकोपर पूर्व येथे झालेली बैठक त्याच अनुषंगाने असल्याचे बोलले जात आहे, पण पक्ष संघटनेची पूर्वीप्रमाणे पुनर्बांधणी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले आहे, तसेच भाजपने घाटकोपरमधील सर्व निवडणुका पक्ष कार्यकर्ते, कुटुंबीय आणि मित्रांना सोबत घेऊन जिंकल्या आहेत.

पण पदाधिकाऱ्यांसोबत संवादात अडचण निर्माण झाल्यानेच लोकसभा हरल्याचे सांगत घाटकोपर पश्चिमचे सध्याचे विद्यमान आमदार पराग शहा यांनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मेहता २०१४ पासून गृहनिर्माण मंत्री होते.

परंतु २०१९ मध्ये दक्षिण मुंबईतील एसआरए योजनेशी संबंधित वादामुळे त्यांनी राजीनामा दिला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी विद्यमान नगरसेवक पराग शहा यांना तिकीट दिले होते.

भाजप विद्यमान आमदार सोडेल की नाही, हे मी सांगू शकत नाही. मी लढण्यास उत्सुक आहे. भाजपने मला सात वेळा तिकीट दिले आहे. माझा अपक्ष म्हणून लढण्याचा कोणताही विचार नाही. पण कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत.

-प्रकाश मेहता, माजी गृहनिर्माण मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT