देशात महागाई वाढत असतानाच मुंबईकरांचा प्रवास महागला आहे. पुण्यात रिक्षाच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मुंबईतही रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार आहे. दरवाढीच्या या निर्णयावर सोमवारी (26 सप्टेंबर) ला शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान 1 ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा,टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.
काही महिन्यांमध्ये पेट्रोल डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे सीएनजी गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली.
राज्यसरकारकडून भाडेवाढ करण्याबाबत निर्णय न घेतल्यास रिक्षा टॅक्सी चालकांनी 26 तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. 13 सप्टेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठकीत निर्णय न झाल्याने टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. रिक्षा, टॅक्सी चालकांच्या संपापूर्वी सरकारकडून तातडीची बैठक घेण्यात आली.
सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांवर पोहचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.