ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर एका रिक्षा चालकानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. पण या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असल्यानं पुढील अनर्थ टळल्याचं सांगितलं जात आहे. (Rickshaw driver attempted suicide outside CM Eknath Shinde house)
विनय पांडे असं या रिक्षाचालक नाव असून त्यानं स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आरटीओनं त्याला रिक्षाचा नवीन परवाना देण्यास नकार दिल्यानं हताश होऊन या रिक्षाचालकानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती मिळतं आहे. (Marathi Tajya Batmya)
सुत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान ठाण्यातील लुईसवाडी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाबाहेर महापालिकेच्या सफाई करणाऱ्या दोन मशीनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. हा कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्री ठाण्यातून रवाना झाले.
पण त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान विनय पांडे हा रिक्षाचालक मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ आला आणि त्यानं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण इथं कायचं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो त्यामुळं पोलिसांनी वेळेत या रिक्षाचालकाला अडवल्यानं पुढील अनर्थ टळला. नंतर या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. (Latest Marathi News)
आंदोलनात सहभागी झाल्याने परवाना नाकारला?
काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांचं एक आंदोलन झालं होतं, त्यामध्ये विनय पांडे हा देखील सहभागी झाला होता. त्यामुळं आंदोलनात सहभागी झाल्यानं त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल असल्यानं रिक्षाचा नवीन परवाना त्याला नाकारण्यात आला असल्याचं पांडे यांचं म्हणणं आहे. विनय पांडे या शिवसेनेचा पदाधिकारी असून तो मुख्यमंत्र्यांच्याच मतदार संघातील असल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.