RPF jawan opens firing in Jaipur-Mumbai train killing four people sequence of events told by eyewitness 
मुंबई

Jaipur-Mumbai Exp Firing : बोगीमध्ये मृतदेह पडले होते, हातात पिस्तुल घेऊन फिरत होता कॉन्स्टेबल; वाचा थरारक घटनाक्रम

रोहित कणसे

Jaipur-Mumbai Exp Firing : जयपुरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये   पहाटे पाच वाजता गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयपूर-मुंबई एक्सप्रेस मंबईच्या दिशेने जात असताना एका आरफीएफ जवानाने चार लोकांवर गोळीबार केला. चेतन सिंह असं या आरपीएफ जवानाचे नाव असून रेल्वेच्या बी-५ कोचमध्ये त्याने फायरिंग केल्याने खळबळ उडाली. या फायरिंगमध्ये सीनियर ऑफिसर एएसआय टीका राम यांच्यासह इतर तीन प्रवाशी ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार चेतन सिंह याचं ट्रान्सफर करण्यात आल्याने तो अस्वस्थ होता. चेतन सिंह याचं गुजरातहून मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलं होतं. यादरम्यान त्याचे सीनियर ऑफिसर सोबत भांडण झालं. याच भांडणादरम्यान त्याने रेल्वेत गोळीबार केला. ज्यामध्ये टीका राम यांच्यासह जवळ बसलेले इतर तीन प्रवासी देखील ठार झाले.

घटनेनंतर ट्रेन मुंबई सेंट्रल स्टेशन वर आणण्यात आली, येथे रेल्वे पोलीसांनी बी-५ कोच ताब्यात घेत घटनेचा तपास सुरू केला. रेल्वेचे एसी अटेंडंट कृष्ण कुमार शुक्ला यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. स्वतःच्या डोळ्यांनी बघीतलेला हा थरारक घटनाक्रम त्यांनी माध्यमांना सांगितला. शुक्ला म्हणाले की, पहाटे पाच वाजण्याची वेळ होती, अचानक बोगीत फायरिंगचा आवज ऐकू आला. मी तेव्हा एसी कोचकडे धावत गेलो, तर जमीनीवर तीन मृतदेह पडलेले होते आणि आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंह रिव्हॉल्वर हातात घेऊन बोगीत फिरत होता. टीका राम गोळी लागल्याने खाली पडले होते आणि चेतन सिंहने काही प्रवाशांना देखील गोळी घातली होती.

पुढे बोलताना शुक्ला यांनी सांगितलं की, या घटनेनंतर बोगीतील प्रवासी प्रचंड भीतीत होते. दरम्यान या घटनेनंतर जीआरपी जवान चेतन सिंहला अरेस्ट करण्यात आले आहे. तर हत्या झालेल्या चार जणांचे मृतदेह कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.

शुक्ला यांनी सांगितले की, हत्याकांडानंतर चेतन सिंह यांने दहिसर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेची चेन खेचली आणि पळून गेला. त्याला रेल्वे पोलिसांनी भायंदर येथून पकडलं. चेतन सिंहने चालवलेल्या गोळ्यांचे व्रण बोगी आणि रल्वेच्या खिडक्यांवर दिसून येत आहेत.

दरम्यान गोळीबार करणारा आरोपी मानसिक तणावाखाली होता की नाही, याची चौकशी सुरु आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आणि या प्रकारामागे नेमकं काय कारण होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT