मुंबई: मध्य रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकात (dadar railway station)धावत्या एक्स्प्रेसमध्ये एक गर्भवती महिला (pregnant women)तिच्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन चढत होती. मात्र, वेगामुळे एक्स्प्रेस पकडताना तोल सुटला. महिला फलाट आणि रेल्वे गाडीमधील असलेल्या पोकळीत पडणार होती. पण कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानाने (Rpf jawan)तातडीने गर्भवती महिला आणि तिच्या मुलाला पकडून त्या दोघांचे प्राण वाचवले. (Rpf jawan save life of pregnant women at dadar railway station)
ही घटना स्थानकांवर बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरपीएफ जवान अशोक यादव याने वेळीच मदत केल्याने प्रवाशाचे प्राण वाचल्याने समाज माध्यामावर त्याचे कौतुक होत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकात सोमवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास फलाट क्रमांक 5 वर ट्रेन क्रमांक 01091 सीएसएमटी- दानापुर एक्स्प्रेस आली. आपल्या नियोजित वेळेत स्थानकावरून पुढच्या प्रवासाला रवाना होत होती. यादरम्यान एक गर्भवती महिला मुलाला घेऊन धावत्या ट्रेनमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेचा तोल गेल्याने फलाट आणि रेल्वे गाडीमधील असलेल्या गॅपमध्ये पडणार होती. तेव्हा कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान अशोक यादव यांनी समयसूचकता दाखवून ट्रेनकडे धाव घेतली. त्या गर्भवती महिला आणि मुलाला पकडून बाजूला केले.
त्यामुळे आई आणि मुलाचे प्राण वाचले. त्यानंतर स्थानकातील इतर सुरक्षा जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेला शांत केले. आरपीएफ जवान अशोक यादव यांच्या धाडसी कामाची दखल आरपीएफ विभाग, मध्य रेल्वे प्रशासन यांच्याकडून घेण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या गर्भवती महिलेचे नाव शोभा कुमारी असून ती बिहारची रहिवासी आहे. शोभा आपल्या मुलाला घेऊन दादरवरुन दानापूरला जात होती. मात्र, रेल्वे स्थानकांवर उशिरा पोहचल्यामुळे शोभाने धावत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला होता. आरपीएफ कॉन्स्टेबल अशोक यादव यांच्या प्रसंगावधानाने शोभाचे प्राण वाचले आहे. गर्भवती शोभाने आपीएफ पोलिसांचे आभार मानले आहेत.
तसेच रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले की, आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. अशोक यादव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिला प्रवाशाच्या जीव वाचला आहे. त्याच्या कार्याची दखल घेऊन रेल्वेकडून सत्कार करण्यात येणार आहे. प्रवाशांना सुरक्षित ठेवणे आमचे हे काम आहे. मला हे काम करत असताना समाधान वाटते. प्रवाशांना आवाहन आहे की, धावती ट्रेन पकडू नये, असे आरपीएफ जवान अशोक यादव यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.