Bhagwan-Bhalerao sakal
मुंबई

Ulhasnagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ! शहराध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन आठवले पक्षातून हकालपट्टी

दिनेश गोगी

उल्हासनगर - पक्ष विरोधी कारवायांचा ठपका ठेवून उल्हासनगरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)या पक्षाचे शहराध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे प्रसिद्धीपत्रक पक्ष सचिव व ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश बारसिंग यांनी जारी केले आहे. विशेष म्हणजे रामदास आठवले यांनीही भालेराव यांच्या हकालपट्टीची पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने हा आक्रमक पवित्रा घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भगवान भालेराव यांनी शहराध्यक्ष सोबतच उपमहापौर पदासारखी महत्त्वाची भूमिका देखील निभावली आहे. मात्र अलीकडच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या विरोधात अनेक पक्षविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या.

पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व संघटनेतून या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे दिसून आले आहे. या तक्रारींमध्ये, पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि संघटनेच्या निर्णयांना मान्यता न देणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. पक्षाच्या या तक्रारींवर गंभीर विचार करून अखेर पक्ष निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी भगवान भालेराव यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर केला.

तसेच शहर कार्यकारिणी देखील याच कारणांमुळे त्वरित बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाची उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी लवकरच नव्या नेतृत्वाखाली पुनर्रचनेत येईल आणि पक्षाच्या नवीन संघटनेचा विचार करून नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात येईल. या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये नवीन उमेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असतील, असे बारशिंग यांनी सांगितले.

भगवान भालेराव यांच्या हकालपट्टीमुळे पक्षात मोठा तणाव निर्माण झाला आहे. भालेराव यांना पक्षातून हाकलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे, तर जुने निष्ठावंत माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व विरोधकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

भालेराव यांच्या हकालपट्टीमुळे त्यांच्या आगामी राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून त्यांचा कल हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भालेराव यांना पत्रकारांनी विचारले असता मीच पक्ष सोडलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN: धावा नाही केल्या तरी काय झालं? Virat Kohli च्या नागीन डान्सवर चाहते खूश, पाहा व्हिडिओ

Bigg Boss Marathi 5: दोनच आठवड्यात Sangram Chougule यांनी घेतला बिग बॉसचा निरोप, कॅप्टन्सी टास्क पडला महागात

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT