मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असतात. त्यात सचिन वाझेला अटक केल्यानंतर एनआयएनं आपल्या तपासाचा वेग आणखीन वाढवला आहे. त्यातच आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता आणखी एका गाडीचा शोध लागला आहे. एनआयए गेल्या अनेक दिवसांपासून ज्या ऑडी कारचा शोध घेत होती. तिची ओळख आता पटलेली आहे. NIAच्या हाती अजून एक अलिशान गाडी लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास NIAन करत होता. या कारमध्येचं विनायक शिंदे आणि सचिन वाझे हे दिसत आहेत. एका टोल नाक्यावरील हा CCTV फूटेज असून ही कार वसई परिसरात असल्याची माहिती NIA ला मिळाली आहे. त्यानुसार NIAकडून आज वसई परिसरातून ही कार जप्त करण्यात आली आहे. दरम्यान एनआयएनं मंगळवारीच एक आऊटलॅंडर गाडीही नवी मुंबईच्या कामोठे परिसरातून जप्त केली आहे.
साम टीव्हीच्या हाती एक CCTV फूटेजचा फोटो लागला आहे. जो वांद्रे वरळी सी लिंकचा आहे. त्यात वाझे हे गाडी चालवत असून शेजारी विनायक शिंदे दिसत आहे. हा सीसीटिव्ही थोडा अस्पष्ट असून NIA कडे अशा प्रकारचे ठोस पुरावे आहेत. MH 04 FZ 6561 असा या ऑडी गाडीचा नंबर आहे.
अँटिलिया बाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटक सापडली. त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी पाच मार्चला मुंब्र्यातील खाडीत मनसुख हिरेनचा मृतदेह आढळला. अंबानींच्या घराबाहेर, ज्या स्कॉर्पियो कारमध्ये स्फोटकं होती, ती कार मनसुख हिरेन वापरत होता. कार चोरीची त्याने तक्रारही नोंदवली होती. एकूणच या सर्व संशयास्पद प्रकरणाचा तपास NIA कडे आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सचिन वाझेला अटक केली. त्यानंतर धक्कादायक खुलाशांची मालिकाच सुरु झाली.
अलीकडेच एनआयएने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक आलिशान गाडी ताब्यात घेतली. नवी मुंबईतल्या वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली. ही आऊटलँडर कामोठे परिसरातल्या एका सोसायटीत पार्क करण्यात आली होती.
आतापर्यंत एनआयएनं आतापर्यंत सचिन वाझे यांच्याशी संबंधित 2 मर्सिडीज, 1 प्राडो, 1 ऑडी, इनोव्हा, स्कॉर्पिओसह एकूण 7 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. NIA या 7 गाड्यांव्यतिरिक्त अजून एक आऊटलँडर आणि स्कोडा गाडीही आता ताब्यात घेतली आहे.
Sachin Waze Case NIA seized Audi car from vasai cctv footage
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.