sachin vaze 
मुंबई

चिकन, अंडी आणि..., वाझेच्या तुरुंगातील मागण्या वाचल्या का?

सकाळ डिजिटल टीम

सचिन वाझेने पुन्हा न्यायालयात धाव घेत आजारपणाचं कारण पुढे केलं आहे. घरच्या जेवणाची आणि फिजिओथेरपीची परवानगी त्याने मागितल्याचं समोर येतंय.

वाझेवर (Sachin Waze) ऑक्टोबरमध्ये ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. त्यामुळे वाझेचं वजन 5 किलोने कमी झालंय. उपचारानंतर डॉक्टरांनी वाझेला नियमित फिजिओथेरपी आणि उच्च प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र जेलमधील कैद्यांना त्याची परवानगी नाही. तसेच यासाठी कोर्टाची विशेष परवानगीही घेणं गरजेचं आहे. (Waze in Special Court)

वाझेला मागील सुनावणीस घरच्या जेवणाला परवानगी जरी दिली असली, तरी कारागृहात त्याला घरातून पाठवलेली अंडी आणि मांसाहार खाण्यास मनाई आहे. त्यामुळे वाझेने कोर्टाकडे नव्याने काही मागण्या केल्या आहेत.

सध्या कारागृहात दाढी करण्यासाठी एकच वस्तरा वापरला जात असल्याचे सांगत यापासून क्षयरोग होण्याची भीती आहे, असं वाझेने सांगितलं. त्यामुळे खासगी ट्रिमर वापरण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी वाझेने संबंधित याचिकेत केली आहे.

8 डिसेंबर रोजी चांदिवाल आयोगात (Chandiwal Commission) चौकशीसाठी नेले जात असताना वाझेला छातीत तीव्र वेदना झाल्या. त्याला चक्कर येत होती. परंतु त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी पुन्हा तुरुंगात आणण्यात आलं. यानंतर याचिकेत खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळावी, अशी मागणी वाझेने केली आहे. ज्या रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तिथे उपचाराची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT