मुंबई: एनआयएने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक आलिशान गाडी ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतल्या वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. ही आऊटलँडर कामोठे परिसरातल्या एका सोसायटीत पार्क करण्यात आली होती. बरेच दिवस गाडी वापरत नसल्याने स्थानिकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. ज्यावरून या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाची व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. NIA ची एक टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे.
आतापर्यंत NIA ला वाझे यांच्याशी संबंधित दोन मर्सिडीज, 1 प्राडो, इनोव्हा, स्फोटक सापडलेली स्कॉर्पिओ आणि नुकतीच ताब्यात घेतलेली आऊटलँडर अशा 6 गाड्या मिळालेल्या आहेत. NIA अजूनही या 6 गाड्यांच्या व्यतिरिक्त अजून एक आऊटलँडर,ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधत आहे.
दुसरीकडे NIA चे डीआयजी विधी कुमार दिल्लीवरून मुंबईत येणार आहेत. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आज मुंबईत दाखल होणार आहेत. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन विधी कुमार हे तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान NIA ने क्राईम ब्रांचमध्ये काम केलेल्या एका अधिकाऱ्याला समन्स पाठवलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या अधिकाऱ्याची नुकतीच क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात आली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात या अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं जात आहे. 4 मार्च रोजी मनसुख याची हत्या करण्यात आली. तेव्हा हा अधिकारी पोलिस आयुक्तालयातील सीआययुच्या कार्यालयात होता. सचिन वाझेने आपला फोन त्याच्याकडे दिला होता आणि कोणाचा फोन आलाच तर तो रिसिव्ह करून वाझे ऑफिसमध्ये असून बिजी असल्याचं सांगायला सांगितलं होतं. याआधीही या अधिकाऱ्याची एटीएसकडून चौकशी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. NIA ला संशय आहे की की वाझे ठाण्याला गेले होते तेव्हा हा फोन या अधिकाऱ्याकडे मुद्दाम देण्यात आला होता.
Sachin Waze luxurious outlander captured by NIA
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.