हा पोलीस कर्मचारी सचिन वाझेचा Right Hand असल्याची चर्चा
मुंबई: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी (Mansukh Hiren Murder) अटक करण्यात आलेला निलंबित पोलीस विनायक शिंदे (Vinayak Shinde) याला दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी 2015 मध्ये लखन भय्या हत्या प्रकरणात जन्मठेप होऊन देखील त्याला अद्याप पोलीस दलातून बडतर्फ (Dismiss) का करण्यात आले नव्हते, हा मोठा प्रश्नच आहे. विनायक शिंदे हा लख्खन भैय्या बनावट चकमक (Lakhan Bhaiyya Fake Encounter) प्रकरणातील आरोपी आहे. बनावट चकमक प्रकरणी विनायक शिंदे याला न्यायालयाने (Court) दोषी ठरवून शिक्षा दिली आहे. विनायक शिंदे हा सचिन वाझे याचे एकदम खास (Right Hand) आहे. सचिन वाझेने विनायक शिंदे यांच्यासोबत अंधेरी युनिट मध्ये एकत्र काम केल्याचे समोर आले आहे. मनसुख हिरेन हत्येप्रकरणात विनायक शिंदे सहभागी असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून विनायक शिंदे याने एक बुकी आणि इतर आरोपींची जुळवाजुळव केल्याचाही संशय आहे. (Sachin Waze Right Hand Mumbai Police Vinayak Shinde dismissed from Force)
मनसुख हिरेन हत्येप्रकरणी त्याला एनआयए ने अटक केली होती.विनायक शिंदे हा वारंवार सचिन वाझे यांना भेटायला येत असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा कट जानेवारी महिन्यात मुंबई पोलीस आयुक्तालयातच शिजल्याचे समोर आले आहे.
मे 2020 मध्ये विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेर आला होता. तब्बल वर्षभर विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेरच होता. फेब्रुवारी 2021 मध्ये विनायक शिंदे मुंबई पोलीस आयुक्तालयात आला होता. सचिन वाझे यांची त्याने भेट घेतली होती. दोघांमध्ये दोन तास बैठक चालली होती. तसेच सचिन वाझेच्या कार्यालयात सुद्धा विनायक शिंदे भेटायला येत असल्याचे समोर आले आहे. विनायक शिंदेने सचिन वाझेंच्या केबिन बाहेरील पोलिसांकडून पोलीस लोगोचे मास्क आणि पोलीस लिहलेली निळी पट्टी मागितल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.