मुंबई

Salim Kutta: सलीम कुत्ता १९९८मध्येच मेला; फडणवीसांनी सविस्तर खुलासा करावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राइट हॅण्ड समजला जाणारा सलिम कुत्ता याची १९९८मध्ये रुग्णालयातच हत्या झाली होती. पण, आमदार नितेश राणे या सलीम कुत्तावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहे.

गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ता प्रकरणी सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

सलीम कुत्ता याला मारणारे रोहित वर्मा, बाळू ठाकरे, संतोष शेट्टी हे लोक आहेत. त्याला तीन बायका होत्या. टाडा कोर्टात त्याच्या तीनही बायकांनी आमचा पती सलीम कुत्ता मेला असून आमची संपत्ती परत करा, अशी विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने जप्त केलेली संपती सलीम कुत्ताच्या कुटुंबीयांना परत केली होती

परंतु, आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्तासाठी आयोजित पार्टीचा फोटो दाखविला आहे. तसेच हा सलीम कुत्ता १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचा दावा करताहेत, तो नेमका कोण, याचा खुलासा गृहमंत्र्यांनी करावा, असे आमदार गोरंट्याल म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: शरद पवार गटात जाण्याऐवजी... फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना दिला होता पर्याय; ''पण वैयक्तिक प्रगतीपेक्षा...''

Gang Rape in Mumbai: मुंबईत खळबळ! CSMT परिसरात टॅक्सीच्यामागे नेऊन २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

Narhari Zirwal: नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले

Latest Marathi News Updates :S Jaishankar Live: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर श्रीलंका दौऱ्यावर

Salman Khan : इट्स फायनल ! आता येणार किक 2 ; निर्माते साजिद नादियाडवाला यांनी शेअर केली पहिली झलक

SCROLL FOR NEXT