Sameer Wankhede esakal
मुंबई

Sameer Wankhede : समीर वानखेडेवर अटकेची टांगती तलवार

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी २५ कोटींची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ईडीने नोंदवलेल्या ईसीआयआर प्रकरणी एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात घेतली धाव.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी २५ कोटींची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ईडीने नोंदवलेल्या ईसीआयआर प्रकरणी एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र मुंबईतील ईसीआयआर दोन दिवसांपूर्वीच दिल्लीला वर्ग केल्याची माहिती आज (ता. १३) ईडीने उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे वानखेडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे.

मुंबई झोनल युनिटमध्ये दाखल केलेला ईसीआयआर दिल्लीत वर्ग करण्यात येऊ नये अशी मागणी करत समीर वानखेडे यांनी ऍड. करण जैन यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली. न्या. प्रकाश नाईक यांच्या समोर आज सुनावणी झाली. वानखेडे यांच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी सांगितले की, ईडी आपल्याला यात नाहक गोवत असून त्रास देत आहे.

सीबीआयच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले असताना ईडीच्या गुन्ह्यात कुठलेही संरक्षण मिळू नये, यासाठी ईडीला मुंबईतील ईसीआयआर दिल्लीला वर्ग करायचा आहे. त्यावर ईडीच्या वतीने अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील ईसीआयआर दिल्लीत वर्ग केला आहे. न्यायालयाने याची दखल घेत वानखेडेंना कुठलाही दिलासा न देता सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : अभिनेते, आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी सोलापुरात 'रोड शो'; नागरिकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT