ठाणे : राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (Enforcement directorate) ताब्यात घेतले असतानाच दुसरीकडे एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांना बुधवारी ठाणे पोलिसांच्या (Thane Police) चौकशीला आठ तास सामोरे जावे लागले. नवाब मलिक यांनी पर्दाफाश केलेल्या नवी मुंबई (Navi mumbai) येथील सद्गुरु बार प्रकरणी ठाण्याच्या कोपरी पोलिस ठाण्यात वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
उच्च न्यायालयाने वानखेडे यांना २८ पेâब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते आज दुपारी साडे अकरा वाजता पोलिस ठाण्यात हजर झाले ते रात्री साडे सातच्या सुमारास बाहेर पडले. यावेळी पोलिसांनी त्यांचा सहा पानी जबाब नोंदवल्याची माहिती हाती आली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांचे सद्गुरु रेस्ट्रो बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला होता.
ज्यावेळी या बारचा परवाना वानखेडे यांना देण्यात आला होता तेव्हा त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते या मुद्द्यावरच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. परवाना घेताना समीर वानखेडे यांनी खोटे वय दाखवल्याचा ठपका ठेवत २ पेâब्रुवारीला ठाणे जिल्हाधिकाNयांनी त्यांचा बारचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी समीर वानखेडे यांना चौकशीसाठी कोपरी पोलिसांनी बोलावले होते. दरम्यान याप्रकरणी अटक टाळण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धावही घेतली होती. राज्य सरकारने अटक टाळण्याची हमी देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयानेच त्यांना २८ पेâब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने समीर वानखेडे दुपारी साडे अकरा वाजता कोपरी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. सुमारे आठ तास ही चौकशी सुरू होती. यावेळी वानखेडे यांनी काही कागदपत्रे सादर केली आहेत.
मलिकांच्या अटकेबद्दल नो कमेंटस
पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करत असून या पुढेही बोलावले की हजर राहिन असे समीर वानखेडे यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच नवाब मलिक यांना अटक झाल्याचे विचारताच त्याबद्दल मला काही बोलायचे नाही असे म्हटले आणि कारमध्ये बसून निघून गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.