मुंबई : चंद्रपुरातून सुलतान या वाघाला मुंबईच्या बोरीवली नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलंय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चार वाघिणी आणि एक वाघ आहे. यातील एका वाघिणीचे वय उलटून गेले असून उर्वरित तीन वाघिणींसाठी जोडीदाराची आवश्यकता आहे. सुलतानला 15 दिवस इतर वाघांपेक्षा वेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात येणार आहे. काही दिवसानंतर त्याला इतर वाघांसोबत ठेवलं जाणार आहे.
सुलनात प्रवासात मिळाला कोंबड्यांचा आहार
नागपूर येथील गोरेवाडा राष्ट्रीय उद्यानातील सुलनातला मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलंय. वाघांना म्हैस किंवा रेड्याचे मांस दिले जाते; मात्र सुलतानला प्रवासात कोंबड्यांचा आहार देण्यात आला.
महत्त्वाची बातमी : स्वतःच जेट विमान असणाऱ्या माधुरीने विकला 'तो' बंगला
बिजली, मस्तानी आणि लक्ष्मीसाठी आला सुलतान
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाच वर्षांच्या सुलतानला प्रजननासाठी आणण्यात आले आहे. तेथील बिजली (9 वर्षे), मस्तानी (9 वर्षे) आणि लक्ष्मी (10 वर्षे) या वाघिणींचा जोडीदार म्हणून सुलतानला आणण्यात आले आहे.
800 किलोमीटरचा प्रवास 48 तासांत
सुलतानने सुमारे 800 किलोमीटरचा प्रवास 48 तासांत पूर्ण केला. प्रवासादरम्यान ठराविक अंतराने वाहन थांबवण्यात येत होते. या प्रवासात त्याला बेशुद्धही करण्यात आले नव्हते. वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांना म्हैस किंवा रेड्याचे मांस दिले जाते; मात्र सुलतानला कोंबडीचे मांस देण्यात आले.
महत्त्वाची बातमी : ''ती'' नकळत झालेली चूक गैरप्रकार नाही - उच्च न्यायालय
सुलतानचा स्वतंत पिंजरा
बईत दाखल झाल्यानंतर सुलतानला स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. काही दिवस त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखरेख राहील, असे राष्ट्रीय उद्यानातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
WebTitle : Sanjay Gandhi National Parks new Sultan arrived from Nagpur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.